आयपीएलमध्ये पुन्हा सट्टेबाजी 

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

कानपूर : बीसीसीआयमधील उलथापालथीस कारणीभूत असलेल्या 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्‍सिंग व सट्टेबाजी प्रकरणानंतर या प्रकाराचे सावट यंदाच्या आयपीएलवरही आले आहे. कानपूरमध्ये 10 मे रोजीच्या दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामना संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.

या सामन्यावर सट्टेबाजी करत असलेल्या काही सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली. हे सट्टेबाज गुजरात संघातील दोन खेळाडूंच्या संपर्कात असल्याची माहिती उघड होत आहे. या सट्टेबाजांनीच दोन खेळाडूंची नावे घेतल्याने या प्रकरणाला गती मिळाली आहे. 

कानपूर : बीसीसीआयमधील उलथापालथीस कारणीभूत असलेल्या 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्‍सिंग व सट्टेबाजी प्रकरणानंतर या प्रकाराचे सावट यंदाच्या आयपीएलवरही आले आहे. कानपूरमध्ये 10 मे रोजीच्या दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामना संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.

या सामन्यावर सट्टेबाजी करत असलेल्या काही सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली. हे सट्टेबाज गुजरात संघातील दोन खेळाडूंच्या संपर्कात असल्याची माहिती उघड होत आहे. या सट्टेबाजांनीच दोन खेळाडूंची नावे घेतल्याने या प्रकरणाला गती मिळाली आहे. 

कानपूर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 40 लाख रोख, पाच मोबाईल जप्त केले. कानपूर पोलिस अधीक्षक आकाश कुल्हारी यांनी दिलेल्या माहितीनुसार- अटक करण्यात आलेल्या व्यक्ती रमेश नयन शहा हा ठाण्यातील; तर रमेश कुमार व विकास चौहान हे दोघेही कानपूरचे रहिवासी आहेत. गुजरात संघातील दोन खेळाडूंशी आपण संपर्कात होतो. त्यांना व्हॉटस्‌ऍप संदेशही पाठवले होते. हे दोन खेळाडू तयार झाले होते आणि आपण सांगू तसा खेळही करण्यास तयार असल्याचे शहाने सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

200 धावा करूनही गुजरातचा संघ हा सामना गमावेल, असाही एक व्हॉटस्‌ऍप संदेश शहाने पाठवला होता, असे पोलिसांनी स्पष्ट केले असून, ते गुजरात संघातील त्या दोन संशयित खेळाडूंचा शोध घेत आहेत. कानपूरमध्ये असलेल्या एकमेव फाइव्ह स्टार हॉटेलच्या 17 व्या मजल्यावरील एका रूममधून शहा आणि विकास यांना अटक केली; तर तिसरा संशयित रमेशला ग्रीन पार्क स्टेडियममधून पकडण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक आकाश कुल्हारी यांनी सांगितले. 

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- रमेश हा सट्टेबाजांसाठी व्यूहरचना करणारा होता. ग्रीन पार्कच्या ग्राउंड्‌समनशी आपण संपर्क साधला असून, त्यांना खेळपट्टीवर अधिक पाणी मारण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्याने शहाला सांगितले होते. खेळपट्टी दमट राहून जास्त धावा फटकावल्या जाऊ नयेत, असा त्यांचा हेतू होता; प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या आणि दिल्लीने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला होता. आपण सर्व तयारी केली असली तरी, धावा फटकावल्या जाण्याच्या पॅटर्नमध्ये काहीही बदल झाला नसल्याचेही रमेशने शहाला सांगितल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आयपीएल सट्टा लावणारे रॅकेट शहाद्रा येथील फर्श बझार येथून उद्‌ध्वस्त केले असून, सहा जणांना अटकही केली होती. हे सट्टेबाज 9 मे रोजी झालेल्या पंजाब व कोलकता सामन्यावर बेटिंग करत होते. विकासनगर येथूनही सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांच्याकडून एक कोटी रुपयांच्या व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. दोन लॅपटॉप, दोन एलसीडी, नोटपॅड व 22 मोबाईलही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांना सांगितले. 

बीसीसीआयनेच दिली टीप 
बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अगोदरच संशय आला असल्यामुळे त्यांनी काही जणांवर आणि त्यांच्या वागण्यावर बारकाईने लक्ष ठेवले होते. त्यामुळेच तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली, असा ई-मेल बीसीसीआयने प्रसिद्ध केला आहे. 
बीसीसीआयकडून मिळालेल्या या माहितीवरून कानपूर पोलिसांनी सट्टेबाजीचे रॅकेट उद्‌ध्वस्त केले. त्यांनी दिलेल्या पुढील माहितीनुसार- रमेश कुमार हा स्टेडियममधील रूममध्येच राहत होता. त्याने तेथूनच दोन संबंधितांना खेळपट्टीबाबतचा अंदाज पाठवला होता. त्याच्या माहितीवरून शहा व विकास सट्टेबाजी करत होता. कुमारचा जो मोबाईल पोलिसांनी जप्त केला, त्यामध्ये खेळपट्टीचे छायाचित्र होते.

Web Title: IPL again in danger of Spot Fixing