दहाव्या मोसमासाठी आज क्रिकेटपटूंचा लिलाव

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या "आयपीएल'चीदेखील चर्चा जोरात आहे. दहाव्या मोसमासाठी उद्या (ता. 20) बंगळूरमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. एकूण 551 क्रिकेटपटूंसाठी बोली लागेल.

बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या "आयपीएल'चीदेखील चर्चा जोरात आहे. दहाव्या मोसमासाठी उद्या (ता. 20) बंगळूरमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. एकूण 551 क्रिकेटपटूंसाठी बोली लागेल.

करारानुसार हा अखेरचा लिलाव असल्यामुळे फ्रॅंचाइजी किती खर्च करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पुढील वर्षी सर्वच खेळाडू लिलावासाठी पात्र ठरणार असल्यामुळे या वर्षी कुणाला घ्यायचे? कुणाला नाही? यासाठी फ्रॅंचाइजींचे "थिंक टॅंक' चांगलेच व्यग्र आहेत.

बंगळूर आणि हैदराबाद यांच्यात दहाव्या मोसमाची पहिली लढत होणार असली, तरी उद्या येथील स्टार हॉटेलमध्ये मैदानाबाहेरचे लिलावाचे नाट्य रंगणार आहे. लिलाव करण्यासाठी प्रसिद्ध असणारे वेल्सचे रिचर्ड मेडले या लिलावाचा हातोडा सांभाळणार आहेत. सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीवरून लिलावाचे थेट प्रक्षेपण होईल. लिलावातून 75 खेळाडूंची निवड होणार असली, तरी यासाठी तब्बल 352 क्रिकेटपटू उपलब्ध आहेत.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असले, तरी ते पूर्ण मोसम खेळू शकणार नाहीत. दोन्ही देशांमध्ये मे महिन्यातच द्विपक्षीय मालिका असल्यामुळे या खेळाडूंना मेच्या पहिल्या आठवड्यातच "आयपीएल'चा निरोप घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांतील खेळाडूंना पर्याय शोधूनच त्यांची खरेदी केली जाईल, असा अंदाज आहे. टी-20 क्रिकेट फलंदाजांचे असले, तरी अनेक संघ फलंदाजीबरोबरच अष्टपैलू खेळाडू निवडण्याकडे अधिक लक्ष देतील. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजही भाव खाऊन जातील, अशी चर्चा आहे.

स्टोक्‍सची चर्चा
फ्रॅंचाइजींना खर्च करण्यासाठी कोट्यवधी रुपये असले, तरी फलंदाज, गोलंदाज यापेक्षा अष्टपैलू खेळाडूंकडे फ्रॅंजाइजी मालकांचा कल अधिक असेल. त्यामुळेच यंदा बेन स्टोक्‍सच्या नावाची चांगलीच हवा आहे. लिलावासाठी स्टोक्‍सची 2 कोटी पायाभूत किंमत असून, त्याची खरेदी किती रुपयांना आणि कोण करतो याविषयी आराखडे आजपासूनच बांधले जाऊ लागले आहेत.

स्थानिक खेळाडू भाव खाणार
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मधूनच निघून जाणार असल्यामुळे स्थानिक खेळाडू भाव खाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सईद मुश्‍ताक अली याने टी-20 स्पर्धेतून आपली योग्यता दाखवून दिली आहे. इशांत शर्मा, इरफान पठाण, वरुण ऍरॉन, विराट सिंग, पृथ्वी शॉ, टी. नटराजन, कुलवंत खेज्रोलिया, बसिल थंपी यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष राहिल. यामध्ये खेज्रोलिया आणि नटराजन ही नावे नवीन असली, तरी त्यांनी विविध फ्रॅंचाइजींच्या ट्रायलमधून लक्ष वेधले आहे.

कोण किती खर्च करणार
दिल्ली डेअर डेव्हिल्स ः 21.5
सनरायझर्स हैदराबाद ः 20.9
रायझिंग पुणे सुपरजाएंट्‌स ः 19.1
गुजरात लायन्स ः 14.35
किंग्ज इलेव्हन पंजाब ः 23.35
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ः 17.825
कोलकता नाइट रायडर्स ः 19.75
मुंबई इंडियन्स ः 11.555
* सर्व रक्कम कोटी रुपयांत

Web Title: IPL auction begins today