हैदराबाद-बंगळूरमध्ये आज सलामी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

हैदराबाद - गतविजेता सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आयपीएलच्या दहाव्या मोसमातील सलामीची लढत होईल. कर्णधार विराट कोहलीसह प्रमुख खेळाडू जायबंदी झाल्यामुळे बंगळूरसमोर कडवे आव्हान असेल. शेन वॉट्‌सन बंगळूरचे नेतृत्व करेल.

हैदराबाद - गतविजेता सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आयपीएलच्या दहाव्या मोसमातील सलामीची लढत होईल. कर्णधार विराट कोहलीसह प्रमुख खेळाडू जायबंदी झाल्यामुळे बंगळूरसमोर कडवे आव्हान असेल. शेन वॉट्‌सन बंगळूरचे नेतृत्व करेल.

घणाघाती फलंदाज ए. बी. डिव्हिलियर्स याची पाठ दुखावली आहे, तर के. एल. राहुल पूर्ण स्पर्धेला मुकेल. त्यातच तरुण फलंदाज सर्फराज खान सराव सामन्यात जखमी झाला. त्यामुळे तो सुद्धा पूर्ण मोसमास मुकण्याची शक्‍यता आहे. विराटच्या अनुपस्थितीत तो सलामीला ख्रिस गेलच्या साथीत येण्याची अपेक्षा होती. गेल आणि वॉट्‌सन यांच्यावर बंगळूरची मदार असेल. हे दोघे कोणत्याही गोलंदाजीच्या चिंधड्या उडवू शकतात. झपाट्याने आगेकूच करणारा केदार जाधव हा राहुलची उणीव भरून काढू शकतो. ऑस्ट्रेलियाचा टी-20 स्टार ट्रॅव्हीस हेड, भारतीय खेळाडू सचिन बेबी, मनदीप सिंग हे सुद्धा ममहत्त्वाचे फलंदाज आहे.

बंगळूरकडे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स, युजवेंद्र चहल असे मोहरे आहेत. चहलने इंग्लंडविरुद्ध सहा विकेटची कामगिरी केली होती. विंडीजचा टी-20 स्पेशालीस्ट सॅम्युएल बद्री, न्यूझीलंडचा ऍडम मिल्ने, डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी असे मोहरे आहेत.
हैदराबादची मदार कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्यावर असेल. गेल्या मोसमात त्याने जोरदार कामगिरी केली. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला धडाकेबाज फॉर्म गवसला नाही, पण धरमशालामधील अखेरच्या कसोटीत त्याने चांगली कामगिरी केली. तो शिखर धवनच्या साथीत सलामीला येईल. भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळविण्यासाठी धवनला ही स्पर्धा महत्त्वाची आहे. युवराज सिंगला मधल्या फळीत लौकिकानुसार खेळ करावा लागेल. मोझेस हेन्रीकेज, केन विल्यम्सन, नमन ओझा, दिपक हुडा आणि विजय शंकर हे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. हैदारबादची गोलंदाजी स्पर्धेत सर्वोत्तम गणली जाते. आशिष नेहरा, भुवनेश्‍वर कुमार, बरींदर शरण यांच्या जोडीला अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशीद खान आहे.

Web Title: ipl cricket competition