बद्रीच्या हॅटट्रिकनंतर पोलार्डचे आक्रमण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

बंगळूर - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला हरवून गुणतक्‍त्यात आघाडी घेतली. सॅम्युएल बद्रीने तिसऱ्याच षटकात हॅटट्रिकचा धक्का दिल्यानंतर वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज किएरॉन पोलार्ड याने चढविलेला हल्ला निर्णायक ठरला.

बंगळूर - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला हरवून गुणतक्‍त्यात आघाडी घेतली. सॅम्युएल बद्रीने तिसऱ्याच षटकात हॅटट्रिकचा धक्का दिल्यानंतर वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज किएरॉन पोलार्ड याने चढविलेला हल्ला निर्णायक ठरला.

मुंबईने चार सामन्यांत तिसरा विजय नोंदविला. सलामीला पुण्याकडून हरल्यानंतर मुंबईने सलग तीन सामने जिंकले आहेत. विराटच्या अर्धशतकानंतरही बंगळूरला 143 धावांचेच आव्हान उभे करता आले. त्यासमोर तिसऱ्याच षटकात मुंबईची चार बाद सात अशी अवस्था झाली होती. बद्रीने पार्थिव पटेल (3), मॅक्‌क्‍लीनाघन (0) आणि रोहित शर्मा (0) यांना अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर बाद केले. रोहितचा त्याने त्रिफळा उडविला. त्यानंतर आधीच्या सामन्यात चमकलेला नितीश राणा 11 धावा काढून बाद झाला. त्यावेळी मुंबईने निम्मा संघ 33 धावांत गमावला होता. अशा कठीण परिस्थितीत पोलार्डला कृणाल पंड्याने साथ दिली. त्यांनी 63 चेंडूंमध्ये 93 धावांची भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ः 20 षटकांत 5 बाद 142 (ख्रिस गेल 22-27 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, विराट कोहली 62-47 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, एबी डिव्हिलियर्स 19, केदार जाधव 9, हरभजन 4-0-23-0, मिचेल मॅक्‌क्‍लीनाघन 4-0-20-2, जसप्रीत बुमराह 4-0-39-0, हार्दिक पंड्या 2-0-9-1) पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स ः 18.5 षटकांत 6 बाद 145 (नितीश राणा 11, किएरॉन पोलार्ड 70-47 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, कृणाल पंड्या नाबाद 37-30 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, हार्दिक पंड्या नाबाद 9-4 चेंडू, 1 षटकार, सॅम्युएल बद्री 4-1-9-4, टायमल मिल्स 3.5-0-36-0, युजवेंद्र चहल 3-0-31-1).

Web Title: ipl cricket competition