पंजाबची घोडदौड कोलकत्याने रोखली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

कोलकता - पंजाबची आयपीएलच्या दहाव्या मोसमातील घोडदौड कोलकात्याने रोखली. ईडन गार्डन्सवर कर्णधार गौतम गंभीरने नाबाद खेळी केली, पण सुनील नारायणची अष्टपैलू कामगिरी तितकीच बहुमोल ठरली. गोलंदाजीत चार षटकांत केवळ 19 धावा दिलेला नारायण सलामीला उतरला. त्याने घणाघाती खेळी केली. 

पंजाबकडून एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे त्यांना 171 धावांचेच आव्हान उभारता आले. कोलकत्याने ते तब्बल 21 चेंडू राखून पार केले. 
 
संक्षिप्त धावफलक 
पंजाब - 20 षटकांत 9 बाद 170 (हशीम अमला 25, मनन व्होरा 28, ग्लेन मॅक्‍सवेल 25, डेव्हिड मिलर 28, वृद्धिमान साहा 25, उमेश यादव 4-033-4, ख्रिस वोक्‍स 3-0-30-2, सुनील नारायण 4-0-19-1) पराभूत वि. कोलकता ः 16.3 षटकांत 2 बाद 171 (सुनील नारायण 37-18 चेंडू, 4 चौकार, 3 षटकार, गौतम गंभीर नाबाद 72-49 चेंडू, 11 चौकार, रॉबिन उथप्पा 26-16 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, मनीष पांडे नाबाद 25-16 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) 

Web Title: ipl cricket match