मुंबईकर जोडीने साकारला दिल्लीचा विजय 

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

स्पर्धेत प्रथमच लय गवसलेल्या दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 219 धावा केल्या. कोलकत्याचा डाव 9 बाद 164 धावांवर मर्यादित राहिला. आव्हानाचा पाठलाग करताना कोलकत्याचा डाव कधीच स्थिरावला नाही. त्यांचा निम्मा संघ 77 धावांत गारद झाला होता. आंद्रे रसेलने फटकेबाजी केली. पण समोरून त्याला साथ मिळाली नाही. 

दिल्ली : नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर जोडीच्या खेळीने आयपीएलमध्ये शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सने दुसऱ्यांदा विजयाचा चेहरा पाहिला. त्यांनी कोलकता नाईट रायडर्सचा 55 धावांनी पराभव केला. 

स्पर्धेत प्रथमच लय गवसलेल्या दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 219 धावा केल्या. कोलकत्याचा डाव 9 बाद 164 धावांवर मर्यादित राहिला. आव्हानाचा पाठलाग करताना कोलकत्याचा डाव कधीच स्थिरावला नाही. त्यांचा निम्मा संघ 77 धावांत गारद झाला होता. आंद्रे रसेलने फटकेबाजी केली. पण समोरून त्याला साथ मिळाली नाही. 

त्यापूर्वी पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांच्या आक्रमक फलंदाजीने दिल्लीचे आव्हान भक्कम झाले. पृथ्वी शॉने 44 चेंडूंत 62, तर श्रेयस अय्यरने 3 चौकार, 10 षटकारांसह 40 चेंडूंत नाबाद 93 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक : दिल्ली : 20 षटकांत 4 बाद 219 (श्रेयस अय्यर नाबाद 93 - 40 चेंडू, 3 चौकार, 10 षटकार, पृथ्वी शॉ 62 -44 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार, कॉलिन मुन्‍रो 33, ग्लेन मॅक्‍सवेल 27, चावला 1-33, मावी 1-58, रसेल 1-28) वि. वि. कोलकता ः 20 षटकांत 9 बाद 164 (आंद्रे रसेल 44, शुभमन गिल 37, सुनील नारायण 26, बोल्ट 2-44, मॅक्‍सवेल 2-22, आवेश खान 2-29, मिश्रा 2-23) 

Web Title: IPL Delhi Daredevils beat Kolkata Knight Riders