नाइट रायडर्सने घेतली डेअरडेव्हिल्सची फिरकी

वृत्तसंस्था
Tuesday, 17 April 2018

कोलकता - नितीश राणा, आंद्रे रसेलची धडाकेबाज फलंदाजी आणि त्यानंतर कुलदीप यादव, सुनील नारायण यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सची फिरकी घेत सोमवारी कोलकता नाइट रायडर्सला ७१ धावांनी विजय मिळवून दिला. 

प्रथम फलंदाजी करताना कोलकताने ९ बाद २०० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा डाव १४.२ षटकांत १२९ धावांतच आटोपला. नितीश राणाची ३५ चेंडूंतील ५९, तर रसेलची १२ चेंडूंतील ४१ धावांच्या झटपट खेळीने कोलकताचे आव्हान उभे राहिले.  

आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाची सुरवातच अपयशी झाली. मावी, पीयूष चावलाने सलामीची जोडी झटपट तंबूत पाठवली. रसेलने श्रेयस अय्यरचा अडथळा दूर केला. त्यानंतर रिषभ पंत आणि ग्लेन मॅक्‍सवेलच्या फटकेबाजीने दिल्लीला दिलासा मिळाला. मात्र, नवव्या षटकात कुलदीपने पंतला बाद केले. मॅक्‍सवेल बाद झाल्यावर त्यांच्या आव्हानातील हवाच निघून गेली. पंत (४३) आणि मॅक्‍सवेल (४७) वगळता दिल्लीचा एकही फलंदाज दोन आकडी मजल मारू शकला नाही. नारायण आणि कुलदीप यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक 
कोलकता २० षटकांत ९ बाद २०० (नितीश राणा ५९, आंद्रे रसेल ४१, रॉबिन उथप्पा ३५, ख्रिस लिन ३१, टिवाटिया ३-१८, ख्रिस मॉरिस २-४१, ट्रेंट बोल्ट २-२९) वि.वि. दिल्ली १४.२ षटकांत १२९ (रिषभ पंत ४३, ग्लेन मॅक्‍सवेल ४७, कुलदीप ३-३२, नारायण ३-१८)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL KKR vs DD cricket sports