आयपीएलच्या लिलावासाठी 76 खेळाडू 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई : गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाचाही आयपीएल लिलाव बंगळूरमध्ये 20 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या या लिलावासाठी 76 खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये 28 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मूळ रकमेतून याअगोदर केलेल्या खरेदीतून शिल्लक राहिलेल्या रकमेतील सर्वांत कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, तर जास्त रक्कम किंग्ज इलेव्हन पंजाबकडे आहे. 

मुंबई : गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाचाही आयपीएल लिलाव बंगळूरमध्ये 20 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या या लिलावासाठी 76 खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये 28 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मूळ रकमेतून याअगोदर केलेल्या खरेदीतून शिल्लक राहिलेल्या रकमेतील सर्वांत कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, तर जास्त रक्कम किंग्ज इलेव्हन पंजाबकडे आहे. 

आयपीएलचा लिलाव हा मैदानावरील सामन्याइतकाच औत्सुक्‍याचा असतो. लोढा शिफारशी, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यामुळे यंदाचा लिलाव पुढे ढकलला जात होता. अखेर 20 तारखेचा मुहूर्त निश्‍चित झाल्याचे आज बीसीसीआयने जाहीर केले. खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावे नोंदवण्याची आजची अखेरची तारीख होती. 

मुंबई इंडियन्सने 20 खेळाडूंच्या खरेदीसाठी 54 कोटी 445 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता नव्या खेळाडूंच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे 11 कोटी 555 लाख रुपयेच शिल्लक आहेत, तर प्रीटी झिंटा सहमालकीण असलेल्या पंजाबकडे सर्वाधिक 23 कोटी 35 लाख रुपये आहेत. जास्तीत जास्त 27 खेळाडू आपल्या संघात घेऊ शकतात; पण मुंबई आणि बंगळुरू यांच्याकडे आताच 20 खेळाडू आहेत. 

यंदाचा लिलाव बंगळूरऐवजी मुंबईत होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. बीसीसीआयचे मुंबईत असलेले मुख्यालय, स्पर्धेचे प्रवर्तक आयएमजी तसेच संघमालकांसाठीही मुंबई सोईची असल्यामुळे मुंबईला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. आतापर्यंतच्या नऊ लिलावांपैकी पाच लिलाव बंगळूरमध्येच झालेले आहेत. 

लिलावासाठी खर्च केलेली रक्कम, शिल्लक असलेली रक्कम आणि शिल्लक खेळाडू 

  • दिल्ली : खर्च (42.9) शिल्लक (32.1) खेळाडू (17) 
  • पंजाब : खर्च (42.65) शिल्लक (23.35) खेळाडू (19) 
  • कोलकता : खर्च (46.25) शिल्लक (19.75) खेळाडू (14) 
  • मुंबई : खर्च (54.445) शिल्लक (11.555) खेळाडू (20) 
  • बंगळुरू : खर्च (53.175) शिल्लक (12.825) खेळाडू (20) 
  • हैदराबाद : खर्च (45.1) शिल्लक (20.9) खेळाडू (17) 
  • पुणे : खर्च (48.5) शिल्लक (17.5) खेळाडू (17) 
  • गुजरात : खर्च (51.65) शिल्लक (14.35) खेळाडू (16) 

(सर्व रक्कम कोटींमध्ये)

Web Title: IPL Mumbai Indians Kevin Pietersen BCCI sports Cricket