'आयपीएल'चे प्ले- ऑफ सामने पुण्याऐवजी कोलकत्यात

वृत्तसंस्था
Friday, 4 May 2018

कोलकता : यंदाच्या "आयपीएल'मधील पुण्यात होणारे दोन प्ले-ऑफ सामने आता कोलकत्यात खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सामने पूर्वनियोजित तारखेलाच म्हणजे 23 आणि 25 मे रोजी होतील, अशी आयपीएल समितीने शुक्रवारी घोषणा केली. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार एलिमिनेटर आणि क्वालिफायर असे दोन सामने पुण्यात होणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून चेन्नई सुपर किंग्जने आपले "होम ग्राउंड'म्हणून पुण्याची निवड केली. त्यांचे सहा सामने पुण्यात झाले. त्यामुळेच पुण्यातील दोन सामने अन्यत्र हलविण्यात येण्याची चर्चा होती.

या दोन सामन्यांसाठी कोलकत्याचे पारडे जड मानले जात होते आणि तसेच झाले. आयपीएलचे कार्याध्यक्ष राजीव शुक्‍ला यांनीच ही माहिती दिली. 

आम्ही या सामन्यांचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत असे बंगाल क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव अविषेक दालमिया यांनी सांगितले. स्पर्धेतील पहिला क्‍वॉलिफायर आणि अंतिम सामना मुंबईत अनुक्रमे 22 आणि 27 मे रोजी होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Playoff games moved to Kolkata from Pune