कोलकत्याचा बंगळूरवर ‘सुहाना’ विजय!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

कोलकता - कोलकता नाईट राडयर्सने आयपीएलच्या ११व्या पर्वात विजयी सुरवात करताना विराट कोहलीच्या बंगळूर संघाला चार विकेट राखून हरविले.

कोलकत्याने १७७ धावांचे आव्हान सात चेंडू राखून पार केले.

सुनील नारायणचे योगदान बहुमोल ठरले. त्याने प्रतिस्पर्धी सलामीवीर ब्रेंडन मॅक्‌लम धोकादायक ठरत असताना त्याला बाद केले. मग स्वतः सलामीला येत १९ चेंडूंतच ५० धावांची खेळी करीत विजयाचा पाया रचला. नितीश राणानेही अष्टपैलू चमक दाखविली. दिनेश कार्तिकने नाबाद ३५ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, कार्तिकने नाणेफेक जिंकून बंगळूरला फलंदाजीचे आमंत्रण दिले. क्विंटन डीकॉक (४) हा चावलाच्या फिरकीवर दुसऱ्याच षटकात चकला. त्यानंतर मॅक्‌लम-विराट यांनी सहाव्याच षटकात अर्धशतक फलकावर लावले. विराटने एक बाजू लढविण्यावर भर देताना संयमी खेळ केला; पण दुसरीकडे नारायणने रंगात येणाऱ्या मॅक्‌लमची दांडी गुल केली. 

डीव्हिलीयर्सने पाच षटकार खेचत डावात जान आणली. कोलकत्याचा ऑफब्रेक गोलंदाज नितीश राणाने डीव्हिलीयर्स आणि विराट यांना १५व्या षटकात पाठोपाठ बाद केले. अखेर मनदीपच्या तडाख्यामुळे बंगळूरने पावणेदोनशेचा टप्पा पार केला. डावाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर विनयने मनदीप व ख्रिस वोक्‍स (५) यांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक 
बंगळूर - २० षटकांत ७ बाद १७६ (ब्रेंडन मॅक्‌लम ४३-२७ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, विराट कोहली ३१-३३ चेंडू, १ चौकार, १ षटकार, एबी डीव्हिलीयर्स ४४-२३ चेंडू, १ चौकार, ५ षटकार, मनदीप सिंग ३७-१८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, विनयकुमार २-०-३०-२, सुनील नारायण ४-०-३०-१, नितीश राणा १-०-११-२) पराभूत विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स - १८.५ षटकांत ६ बाद १७७ (नारायण ५०-१९ चेंडू, ४ चौकार, ५ षटकार, राणा ३४-२५ चेंडू, २ चौकार, २ षटकार, कार्तिक नाबाद ३५, युजवेंद्र चहल ३-०-२९-०, वोक्‍स ४-०-३६-३, उमेश यादव ४-०-२७-२).

Web Title: ipl premier league calcutta banglur cricket