esakal | चेन्नईकर चाहत्यांसाठी आज येणार मोठा क्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil-gavaskar

चेन्नईकर चाहत्यांसाठी आज येणार मोठा क्षण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चेन्नईची विजयी फॉर्म कायम राखण्याची इच्छा असेल, पण त्यांच्याप्रमाणेच पहिला सामना जिंकलेल्या कोलकात्याचे आव्हान खडतर असेल. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील प्रेक्षकांसाठी हा मोठा क्षण असेल. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ते आपल्या आवडत्या संघाला खेळताना पाहतील. स्टेडियम खचाखच भरलेले असेल आणि सगळीकडे चेन्नईच्या जर्सीचा पिवळा रंग दिसेल.

कोलकत्यातील ईडन गार्डन्सवर असेच दृश्‍य रविवारी दिसले. त्या वेळी रॉयल चॅलेंजर्सपेक्षा केवळ विराटला प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांची संख्या बऱ्यापैकी होती; पण बाकी सर्वत्र नाईट रायडर्सच्या जर्सी दिसत होत्या. आंतरराष्ट्रीय फुटबॉल लीगप्रमाणे आयपीएलला चाहत्यांचे प्रेम फारसे लाभलेले नाही असे म्हणणाऱ्यांना यामुळे आश्‍चर्य वाटेल. मुख्य म्हणजे आयपीएलला केवळ दहाच वर्षे झाली आहेत. त्यामुळे कट्टर चाहत्यांचा वर्ग निर्माण होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. यानंतरही प्रत्येक फ्रॅंचाइजीला लक्षणीय चाहते लाभले आहेत. प्रामुख्याने होम ग्राउंडवर तरी दिसणारे चित्र चाहत्यांची प्रचंड उपस्थिती दर्शविते.

धोनीचे तीन स्पीनर्स खेळविण्याचे डावपेच चांगले ठरले. याचे कारण फलंदाज चेंडूच्या वेगाचा वापर करण्यास आतूर असतात. स्पीनरने टाकलेला चेंडू मात्र पीचवर पडल्यानंतर हळू येतो आणि तो उत्तुंग फटका मारण्यासाठी तेवढा सोपा नसतो. कोलकात्याकडे बडा स्टार नसला तरी त्यांच्या तरुण खेळाडूंनी सुरवात चांगली केली आहे.

loading image