गेलच्या ‘पॉवर-शो’मुळे करुण, राहुलला प्रेरणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पंजाबचा संघ आतापर्यंतची सर्व ११ वर्षे आयपीएलचा घटक राहिला आहे. आतापर्यंतच्या स्थितीनुसार यंदाचा मोसम त्यांच्यासाठी सर्वोत्तम कामगिरीमध्ये गणला जात आहे. सध्या ते गुणतक्‍त्यात तिसरे आहेत. त्यांच्या खेळाडूंना कामगिरीचा अभिमान नक्कीच बाळगता येईल. संघाचा चेहरामोहरा बदलण्याचा बरोबर निर्णय सेहवागने घेतला. लिलावात त्यांनी आवश्‍यकतेनुसार योग्य खेळाडू निवडले. पूर्वी या संघाला झगडावे लागायचे. आता अश्‍विन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रारंभीच लय मिळविली आहे.

पंजाबने कधीच बचावात्मक खेळ केलेला नाही. अश्‍विनच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रत्येक सामन्यात काहीतरी नावीन्य दाखविले आहे. गेलचा झंझावात, राहुलची धूर्त खेळी किंवा अंकित राजपूतच्या पाच विकेट अशी उदाहरणे देता येतील. त्यांच्या खेळाडूंनी मैदानावर शंभर टक्के प्रयत्न केले आहेत. लिलावात दोन वेळा बोली लागली नसताना गेलने आतापर्यंत दाखविलेला ‘पॉवर-शो’ समाधानकारक ठरला आहे. सुरवातीला नाकारला गेल्यामुळेच तो आतून प्रेरित झाला आहे. त्याच्यामुळे करुण नायर आणि राहुल अशा खेळाडूंना स्फुरण चढत असल्याचे दिसते. अशा या पंजाब संघाने गुणतक्‍त्यात आघाडी घेतली तर ते विलक्षण ठरेल.

दुसरीकडे मुंबईचा संघ अनेक वेळा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात यशस्वी ठरला आहे, पण यंदाचा मोसम त्यांच्यासाठी सोपा ठरलेला नाही. काही वेळा अप्रतिम खेळ झाला असला तरी त्यांचा जादुई स्पर्श हरपल्याचे दिसते. कागदावर सर्वोत्तम वाटणाऱ्या या संघाला मागील मोसमांतून प्रेरणा घेता येईल आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विजयी फॉर्म्युला मिळून शोधता येईल.

आयपीएलच्या निम्म्या टप्प्यास दोन्ही संघ विशिष्ट वळणावर आहेत. अशावेळी अश्‍विन विरुद्ध रोहित असा मुकाबला उत्कंठावर्धक ठरेल. या खेळाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन डावपेचांची अंमलबजावणी करणे कर्णधारांसाठी महत्त्वाचे ठरेल. ते खेळाडूंच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवतात. नव्या गुणवान खेळाडूंना संधी देऊन त्यांना घडवितात. त्याचवेळी टी-२०मधील मनोरंजनाचा तडका कायम ठेवतात. दोन्ही संघांना चढ-उतारांना सामोरे जावे लागले आहे. अखेरच्या काही सामन्यांतील त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल. अश्‍विन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संधी साधली पाहिजे. अंतिम फेरी कोण गाठणार हे पाहण्यास मी आतुर आहे.

Web Title: IPL premier league cricket Chris Gayle Power show