कोलकताचाही बंगळूरला दणका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 April 2018

बंगळूर - सलामीचा फलंदाज ख्रिस लीनच्या तडाखेबंद खेळाने आयपीएलमध्ये कोलकता नाइट रायडर्सने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सहा गडी राखून पराभव केला. या आणखी एका पराभवाने बंगळूरसमोरील अडचणी वाढल्या असून, ते तळाला गेले आहेत. 

बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७५ धावा केल्या. कोलकताने १९.१ षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या.

बंगळूर - सलामीचा फलंदाज ख्रिस लीनच्या तडाखेबंद खेळाने आयपीएलमध्ये कोलकता नाइट रायडर्सने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सहा गडी राखून पराभव केला. या आणखी एका पराभवाने बंगळूरसमोरील अडचणी वाढल्या असून, ते तळाला गेले आहेत. 

बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७५ धावा केल्या. कोलकताने १९.१ षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना लीन-सुनील नारायण यांच्या वेगवान सलामीपासून सगळे कोलकात्याच्या मनाप्रमाणे घडले. लीनचा सोडलेला झेल बंगळूरला चांगलाच महागात पडला. नारायण बाद झाल्यावर रॉबिन उथप्पानेही वेगवान खेळी केली. राणा जखमी झाल्यामुळे खेळायला आलेला आंद्रे रसेल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने थोडावेळ बंगळूरच्या खेळाडूंमध्ये उत्साह वाढला. 

त्यावेळी कर्णधार दिनेश कार्तिकची लीनला चांगली साध मिळाली. फिरकी गोलंदाजीवर हल्लाबोल करून लीनने आपली खेळी सजवली. विजय दृष्टिक्षेपात असताना कार्तिक बाद झाला. त्यानंतर आलेल्या शुभमन गीलने विजयी चौकार खेचला.

त्यापूर्वी, डिव्हिलर्सच्या जागी संधी मिळालेल्या ब्रॅंडन मॅकलम आणि क्विंटॉन डी कॉक या सलामीच्या जोडीने या वेळी बंगळूरला चांगली सुरवात दिली. या दोघांनी ६७ धावांची सलामी दिली. त्या वेळी कुलदीपने डिकॉकला बाद करून कोलकताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर रसेलने पाठोपाठच्या चेंडूवर मॅकलम आणि मनन व्होरा यांना बाद करून बंगळूरला अडचणीत आणले.
 तेव्हा कोहलीने एकाहाती बंगळूरला पावणे दोनशेची मजल मारून 
दिली. कोहली ६८ धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक 
बंगळूर २० षटकांत ४ बाद १७५ (कोहली ६८ -४४ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, मॅकलम ३८, डिकॉक २९, रसेल ३-३१) पराभूत वि. कोलकता १९.१ षटकांत ४ बाद १७६ (ख्रिस लीन नाबाद ६२ -५२ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, सुनील नारायण २७- १९ चेंडू ३ चौकार १ षटकार, उथप्पा ३६ -२१ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, कार्तिक २३ - १० चेंडू २ चौकार १ षटकार, सिराज २-४०, एम. 
अश्‍विन २-३६).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition