दिल्लीला हैदराबादचा पठाणी हिसका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

हैदराबाद - अचूक गोलंदाजी आणि संयमी फलंदाजीला अखेरच्या टप्प्यात पठाणी हिसका दाखवत सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्ये शनिवारी दिल्ली डेअर डेव्हिल्सवर सात गडी राखून विजय मिळविला.  

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला ५ बाद १६३ असे रोखल्यानंतर हैदराबादने १ चेंडू राखत ३ बाद १६४ धावा केल्या. चांगल्या सुरवातीनंतर युसूफ पठाणच्या १२ चेंडूंतील २७ धावा निर्णायक ठरल्या.

विजयासाठी १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि ॲलेक्‍स हेल्स यांनी हैदराबादला झकास सुरवात करून दिली. ही जोडी बाद झाल्यावर विल्यम्सनने संयम राखत प्रथम मनीष पांडे आणि नंतर युसूफ पठाणला साथीला घेत मिळालेल्या चांगल्या सुरवातीवर विजयाचा कळस चढवला. त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाला पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिलेल्या भक्कम सुरवातीचा फायदा उठवता आला नाही.  

संक्षिप्त धावफलक - दिल्ली २० षटकांत ५ बाद १६३ (शॉ ६५ -३६ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, अय्यर ४४ -३६ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, शंकर नाबाद २३, रशिद खान २-२३) प. वि. हैदराबाद १९.५ षटकांत ३ बाद १६४ (हेल्स ४५ -३१ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, शिखर धवन ३३, विल्यम्सन नाबाद ३२, पांडे २१, युसूफ पठाण २७ -१२ चेंडू, २ चौकार, २ षटकार, अमित मिश्रा २-१९)

Web Title: IPL Premier League Cricket Competition