राहुलने साकारला पंजाबचा विजय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 May 2018

इंदूर - अखेरपर्यंत टिकून राहिलेल्या लोकेश राहुलच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमधील आपली आगेकूच कायम राखली. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सहा गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला ९ बाद १५२ धावांत रोखल्यावर पंजाबने १८.४ षटकांत ४ बाद १५५ धावा केल्या. अडखळत झालेल्या सुरवातीनंतर राहुल अखेरपर्यंत टिकून राहिल्यानेच त्यांचा विजय सुकर झाला. त्याने ५४ चेंडूंत नाबाद ८४ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान २० षटकांत ९ बाद १५२ (जोस बटलर ५१ -३९ चेंडू, ७ चौकार, सॅमसन २८, गोपाळ २४, मुजीब उर रहमान ३-२७, ॲण्ड्य्रू टाय २-२४) प.वि. पंजाब १८.४ षटकांत ४ बाद १५५ (राहुल नाबाद ८४ -५४ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार, नायर ३१, स्टाईनिस नाबाद २३)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition