विराटच्या बंगळूरला १४६ धावाही महाग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

हैदराबाद - कमी धावसंख्येचे संरक्षण करण्याची मालिका सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धही कायम राखली. भुवनेश्‍वर कुमार, सिद्धार्थ कौलच्या अचूकतेमुळे बंगळूरला हैदराबादने दिलेले १४७ धावांचे आव्हानही पेलवले नाही आणि त्यांना पाच धावांनी हार पत्करावी लागली. बंगळूरची दहा सामन्यांतील ही सातवी हार आहे, तर हैदराबादने आठव्या विजयासह अग्रस्थान आणि बाद फेरीतील स्थान भक्कम केले. 

केन विल्यम्सनच्या आक्रमक अर्धशतकानंतरही हैदराबादला दीडशेची मजल गाठता आली नाही. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळूरने ७ षटकात ६० धावांचा तडाखा दिला होता; पण १ बाद ६० वरून त्यांची अवस्था ११.४ षटकांत ५ बाद ८४ झाली. त्यातून हैदराबादविरुद्ध सावरणे बंगळूरच्या आवाक्‍या बाहेरचेच होते.  

संक्षिप्त धावफलक - हैदराबाद २० षटकांत - १४६ (विल्यम्सन ५६ - ३९ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकार, शकीब ३५ - ३२ चेंडूंत ५ चौकार, साऊदी ३-३०, सिराज ३-२५) वि. वि. बंगळूर  ६ बाद १४१ (पार्थिव पटेल २०, विराट कोहली ३९, मनदीप सिंग नाबाद २१, कॉलिन ग्रॅंडहोम ३३, शकिब २-३६).

Web Title: IPL Premier League Cricket Competition