esakal | राहुलच्या प्रतिकारानंतरही पंजाबचा पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

IPL

राहुलच्या प्रतिकारानंतरही पंजाबचा पराभव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जयपूर - लोकेश राहुलच्या जिगरबाज ९५ धावांच्या खेळीनंतरही आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाबला पराभवाचाच चेहरा पाहावा लागला. राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी विजय मिळवून आपल्या आव्हानातील धुगधुगी कायम राखली. 

प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरवातीनंतरही राजस्थानचा डाव ८ बाद १५८ असा मर्यादित राहिला. राजस्थानने ७ बाद १४३ धावा केल्या. संघ निवडीपासून चुका झालेल्या पंजाबला आव्हानाचा पाठलाग जमलाच नाही. ख्रिस गेल एकच चेंडू खेळू बाद झाल्यावर त्यांचे अन्य फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावूनच परतले. त्यामुळे आवश्‍यक धावगतीचे समीकरण जुळवताना लढवय्या लोकेश राहुल एकटा पडला. त्याने ७० चेंडूंत ११ चौकार, २ षटकारांसह नाबाद ९५ धावा केल्या. 

त्यापूर्वी, जोस बटलर एका बाजूने सतराव्या षटकापर्यंत टिकून राहिल्याने राजस्थानच्या डावाला स्थिरता मिळाली. आक्रमक सुरवातीमुळे राजस्थान मोठी मजल मारणार, अशीच अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या मधल्या  फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुजबीर रहमान आणि अँड्रयू टाय या दोघांनी राजस्थानच्या डावाला रोखले होते. पण, बटलरने टिच्चून फलंदाजी केल्याने राजस्थानला दीडशेची मजल शक्‍य झाली. बटलरने ५८ चेंडूंत ८२ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक 
राजस्थान २० षटकांत ८ बाद १५८ (जोस बटलर ८२ -५८ चेंडू, ९ चौकार, १ षटकार, संजू सॅमसन २२, अँड्रयू टाय ४-३४, मुजीब उर रहमान २-२१) वि.वि. राजस्थान २० षटकांत ७ बाद १४३ (लोकेश राहुल नाबाद ९५ -७० चेंडू, ११ चौकार, २ षटकार, कृष्णप्पा गौतम २-१२)

loading image