सनरायझर्स हैदराबाद धडाक्यात प्लेऑफमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 May 2018

दिल्ली - गोलंदाजीत कमीत कमी धावसंख्येचेही यशस्वी संरक्षण करणाऱ्या हैदराबादने आज मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून फलंदाजीतही आपली ताकद भक्कम असल्याचे दाखवून दिले. दिल्लीचा नऊ विकेटने पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफ गाठणारा पहिला संघ असा बहुमानही मिळवला. दिल्लीच्या रिषभ पंतची १२८ धावांची खेळी व्यर्थ ठरली.

प्लेऑफ निश्‍चित करताना हैदराबादने केलेली आजची परिपूर्ण कामगिरी त्यांना अधिक सक्षम करणारी ठरली. पंतच्या धडाकेबाज शतकामुळे दिल्लीने १८७ धावा उभारल्या; परंतु हैदराबादने हे आव्हान सात चेंडू राखून पार केले. शिखर धवन (नाबाद ९२) आणि केन विलिमसन (नाबाद ८३) यांनी अर्धशतके करताना दहा धावांच्या सरासरीने १७६ धावांची नाबाद भागीदारी केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या दिल्लीची सुरवात खराब होती. त्यांचे २१ धावांत पृथ्वी शॉ आणि जेसन रॉय हे दोन्ही सलामीवीर परतले होते. कर्णधार श्रेयस अय्यरही एकेरी धावात धावचीत झाला. दिल्लीवर संकट आलेले असताना रिषभ पंतने मात्र आक्रमण हा उत्तम बचाव असल्याचे दाखवून दिले.

हैदराबादच्या गोलंदाजीवर पंतने सणकून प्रहार केला. त्याने ५६ चेंडूंत शतक झळकावल्यानंतरही टोलेबाजी केल्यामुळे दिल्लीने १८७ धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक - दिल्ली - ५ बाद १८७ (रिषभ पंत १२८- ६३ चेंडू, १५ चौकार, ७ षटकार, हर्षल पटेल २४  शकीब २७-२) पराभूत वि. हैदराबाद ः १८.५ षटकांत १ बाद १९१ (शिखर धवन नाबाद ९२- ५० चेंडू, ९ चौकार, ४ षटकार, केन विलिमसन नाबाद ८३- ५३ चेंडू, ८ चौकार, २ षटकार)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition