कोलकत्याने ईडनवर चेन्नईला चकविले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 May 2018

कोलकाता - कोलकता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये गुरुवारी ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जला चकविले. शुबमान गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकत्याने १७८ धावांचे आव्हान तब्बल १४ चेंडू राखून पार केले. गिल-कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी ३६ चेंडूंतच रचली. १५व्या षटकात के. एम. असीफला गिलने दोन, तर कार्तिकने एक षटकार मारला. या षटकात २१ धावा गेल्या. कार्तिकने १८व्या षटकात चेन्नईचा अष्टपैलू ब्राव्होला तीन चौकार मारले.

तत्पूर्वी, कार्तिकने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजी दिली. चेन्नईने ५ बाद १७७ धावसंख्या उभारली. सलामीवीर वॉट्‌सन याने फॉर्म कायम राखला. त्याला फाफने जोरदार साथ दिली. वेगवान गोलंदाज जॉन्सन व फिरकी गोलंदाज चावला यांची धुलाई झाली. अखेर कोलकत्याने डावाच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईच्या धावसंख्येला काहीसा लगाम घातला. यात नारायणचा वाटा मोलाचा होता. पॉवर-प्लेमध्ये ५७ धावा, तर १२व्या षटकात शतक पूर्ण केलेल्या चेन्नईला नंतर टॉप गीअर टाकता आला नाही. धोनीने पावणेदोनशेचा टप्पा कसाबसा पार करून दिला.

संक्षिप्त धावफलक - चेन्नई - २० षटकांत ५ बाद १७७ (शेन वॉट्‌सन ३६-२५ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, फाफ डू प्लेसिस २७-१५ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, सुरेश रैना ३१-२६ चेंडू, ४ चौकार, अंबाती रायुडू २१-१७ चेंडू, ३ चौकार, धोनी नाबाद ४३-२५ चेंडू, १ चौकार, ४ षटकार, रवींद्र जडेजा १२, मिचेल जॉन्सन ४-०-५१-०, पीयूष चावला ४-०-३५-२, सुनील नारायण ४-०-२०-२, कुलदीप यादव ४-०-३४-१) पराभूत विरुद्ध कोलकता - १७.४ षटकांत ४ बाद १८० (ख्रिस लीन १२, नारायण ३२-२० चेंडू, ४ चौकार, २ षटकार, उथप्पा ६, शुबमान गिल नाबाद ५७-३६ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, कार्तिक नाबाद ४५-१८ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, एन्गिडी ३-०-३६-१, रवींद्र जडेजा ४-०-३९-१, हरभजन ३-०-२०-१, ड्‌वेन ब्राव्हो १.४-०-२२-०).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl premier league Cricket Competition calcutta chennai