कर्णधारांचेही योगदान ठरत आहे महत्त्वाचे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 May 2018

संघाच्या कामगिरीत कर्णधाराची भूमिका किती महत्त्वाची हे यंदाच्या आयपीएल मोसमात पुन्हा एकदा दिसून आले. गुणतक्‍त्यात आघाडीवर असणाऱ्या संघांच्या यशात त्यांच्या कर्णधाराचा मोठा वाटा आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. त्याच्या विरुद्ध गोष्ट तळातील संघांची आहे. त्या संघांचे कर्णधारच आपला खेळ उंचावू शकलेले नाहीत. पर्यायाने त्याचा परिणाम सांघिक कामगिरीवर झाला. 

केवळ कर्णधाराच्या जोरावर संघाची आगेकूच कशी सुरू राहते हे पहायचे असेल, तर सनरायझर्स हैदराबाद संघ आणि त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन हे उत्तम उदाहरण आहे. तो नुसताच धावा करत नाही, तर मैदानावरील त्यांचा शांत वावर हादेखील खूप काही सांगून जातो. बंगळूर-विरुद्धच्या सामन्यात कोहलीचा झेल त्याच्या हातून सुटल्यानंतर त्याने निराशा जरूर व्यक्त केली. पण, ती तेवढ्यापुरतीच होती. लगेच त्याने क्षेत्ररचनेत बदल केला. कोहली झोकात खेळत असताना युसूफ पठाणने त्याचा अप्रतिम झेल घेत सामन्याचे चित्रच बदलून टाकले. अन्य संघांपेक्षा फलंदाजीचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध असूनही बंगळूर संघ आव्हानाचा पाठलाग करताना कायम गडबडला आहे. प्रथम फलंदाजी करण्यापेक्षा आव्हानाचा पाठलाग करताना आवश्‍यक धावांची गती किती महत्त्वाची असते हे या सामन्यावरून पटते. कोहली धोनीसारखे नेतृत्व देऊ शकत नाही आणि डग आउटमध्ये शास्त्री आणि बांगर यांची गैरहजेरी त्याला मदत करायला नाहीत हे वारंवार दिसून येत आहे. 

रविचंद्रन अश्‍विन यानेदेखील उत्तम गोलंदाजाबरोबर कर्णधाराची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली आहे. मुळात अश्‍विन एक विचार करणारा क्रिकेटपटू आहे. आयपीएलमध्ये मिळालेल्या या जबाबदारीमुळे तो प्रत्येक सामन्यातून प्रगल्भ होत आहे. यावर्षी रोहित खेळला, तरच मुंबईची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून आले आहे. त्याच्या नेतृत्वापेक्षा मुंबईला त्याच्या धावांची अधिक गरज आहे. आता कोलकता संघाविरुद्ध त्यांनी बाजी मारली, तर त्यांना पुनरागमनाची खऱ्या अर्थाने संधी आहे असे मानता येईल. कोलकता संघालाही दिनेश कार्तिकने चांगले नेतृत्व दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition Captain Sunil gavaskar