चेन्नईविरुद्ध लागणार दिल्लीकरांची कसोटी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 April 2018

आयपीएलच्या या अकराव्या पर्वातही क्रिकेटचा मनमुराद आनंद आणि गुणवत्ता पाहायला मिळत आहे. या दोन्ही आघाड्यांवर हे पर्वही कुठे कमी पडलेले नाही. प्रत्येक सामना आपापल्या परीने सर्वोत्तम ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कमालीचे सातत्य राखणारा चेन्नई संघ आज यंदा अडथळ्याची शर्यत करणाऱ्या दिल्लीशी खेळणार आहे. दोन्ही संघ चांगले आहेत; पण आपली एकत्रित गुणवत्ता मैदानात उतरविण्याची दोघांची पद्धती वेगळी आहे. 

आघाडीच्या भक्कम खेळींमुळे प्रत्येक सामन्यात चांगल्या धावा झाल्या आहेत. चेन्नईविरुद्ध मुंबईने ज्या पद्धतीने आव्हानाचा पाठलाग केला ते बघता टी २० क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, याची आठवणच क्रिकेट चाहत्यांना झाली असेल. एक काळ आयपीएलचा विशेषज्ञ मानला जाणाऱ्या सुरेश रैनाला या सामन्यात बऱ्याच दिवसांनी लय गवसली. अष्टपैलू जडेजा आणि ब्राव्हो यांना फलंदाजी आणि गोलंदाजी यातील फरक कळला असेल. खास शैलीत सामना संपविण्याची क्षमता असणाऱ्या धोनीलाही प्रथम फलंदाजी आणि आव्हानाचा पाठलाग करण्यातील फरक कळाला असेल. 

दुसरीकडे दिल्लीला कोलकताविरुद्ध विजयाचा मार्ग गवसला. नेतृत्वाची संधी मिळालेला श्रेयस अय्यर आणि भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ या दोन युवा खेळाडूंनी दिल्लीचे दरवाजे अजून बंद झालेले नाहीत याचीच आशा चाहत्यांना दाखवली. ट्रेंट बोल्टची गोलंदाजीदेखील अचूक होती. त्यांच्याबाबतीत आणखी एक विषय चर्चेचा होऊ शकतो, पण ते सत्य आहे. गंभीरला वगळल्यामुळे संघाला आपले आव्हान अजून संपलेले नाही याचा विश्‍वास निश्‍चित मिळाला. आता धोनी आणि त्याच्या शिलेदारांविरुद्ध श्रेयस अय्यर काय कल्पना लढवतो, हे पाहणे रंगतदार ठरेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL premier league cricket competition Chennai with Delhi vivian richards