दिल्लीची राजस्थानवर मात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 May 2018

नवी दिल्ली - दिल्ली डेअरडेव्हिल्सने आयपीएलमध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्सला चार धावांनी हरविले. डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार १२ षटकांत १५१ धावांचे आव्हान असताना राजस्थानचे झुंजार प्रयत्न ट्रेंट बोल्टमुळे अपयशी ठरले.

नवी दिल्ली - दिल्ली डेअरडेव्हिल्सने आयपीएलमध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्सला चार धावांनी हरविले. डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार १२ षटकांत १५१ धावांचे आव्हान असताना राजस्थानचे झुंजार प्रयत्न ट्रेंट बोल्टमुळे अपयशी ठरले.

शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना बोल्टने सुरवात वाईडने होऊनही एका चौकारासह १० धावा दिल्या. याशिवाय त्याने सॅमसन (३), स्टोक्‍स (१) यांना बाद केले, तर त्रिपाठीला (९) धावचीत केले. तत्पूर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजी दिली. पावसामुळे सुरवातीला १८ षटकांचा सामना करण्यात आला. पाच चेंडू बाकी असताना दिल्लीच्या ६ बाद १९६ धावा झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाऊस आला. परिणामी, डाव तेथेच थांबविण्यात आला. दिल्लीकडून लोकल बॉय पंत, पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी केली. 

संक्षिप्त धावफलक -
दिल्ली - १७.१ षटकांत ६ बाद १९६ (पृथ्वी शॉ ४७, श्रेयस अय्यर ५० रिषभ पंत ६९-२९ चेंडू, ७ चौकार, ५ षटकार, विजय शंकर १७, धवल ३-०-३७-१, उनडकट ४-०-४६-३) विजयी विरुद्ध राजस्थान - १२ षटकांत ५ बाद १४६ (शॉर्ट ४४-२५ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, जॉस बट्‌लर ६७-२६ चेंडू, ४ चौकार, ७ षटकार, के. गौतम १८, ट्रेंट बोल्ट ३-०-२६-२, अमित मिश्रा २-०-१२-१)  (आव्हान १२ षटकांत १५१)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition delhi Rajasthan