रोहितच मुंबईसाठी हुकमी एक्का

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 April 2018

आयपीएलच्या गुणतक्‍त्यात क्रमांक खाली-वर होण्यास आता सुरवात झाली आहे. आघाडीवर असणाऱ्या  चेन्नई सुपर किंग्जवर सफाईदार विजय मिळवून मुंबईने आपल्या आशा पल्लवित केल्या. गेल्या आयपीएलमध्येही त्यांनी अशीच संथ सुरवात केली होती आणि पुढे जाऊन ते विजेते ठरले होते. आता कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित शर्मा संघाला कशी दिशा देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी विलक्षण आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त षटके त्याने खेळणे आणि त्यासाठी वरच्या क्रमांकावर खेळायला येणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी आता तोच हुकमी एक्का आहे.

मुंबई- विरुद्धच्या परतीच्या लढतीत चेन्नईची गडबड झाली. अर्थात, या एका पराभवाचा फार काही फरक पडत नाही. त्यांच्यात मुसंडी मारण्याची क्षमता आहे. आता त्यांची लढत दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाशी आहे. या संघानेदेखील मुंबईप्रमाणे आपली पराभवाची मालिका थांबवली आहे. नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या सुरेख खेळीला याचे श्रेय जाते. दिल्लीने श्रेयसच्या खेळीने या वेळी प्रथमच द्विशतकी मजल मारली. त्यांच्या गोलंदाजांनीही चांगले प्रयत्न केले. कर्णधार म्हणून पुढे होऊन श्रेयसने असाच खेळ केला, तर त्यांना चेन्नईलाही हरवणे शक्‍य आहे. रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली ते नक्कीच आपला खेळ उंचावू शकतात. त्याहीपेक्षा आता एखादा पराभवही आपल्याला मारक आहे, याची जाणीव त्यांनी इथून पुढे प्रत्येक सामन्यात ठेवायला हवी. 

भारताच्या दोन युवा गोलंदाजांना अपशब्द वापरल्याबद्दल ताकीद मिळाली, हे एका अर्थाने चांगले झाले. विकेट मिळविल्याच्या आनंदात आपल्या उत्साहावर नियंत्रण राखणे जमायलाच हवे. आपल्यावर कॅमेरे नजर ठेवून आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. दुसरे म्हणजे विजयातही प्रतिस्पर्धी खेळाडूंचा आदर करायला हवा, हे त्यांना या शिक्षेमुळे कळाले असेल. एखादी विकेट मिळविल्यावर किंवा अर्धशतक, तसेच शतक केल्यावर खेळाडू अलीकडे इतके उत्तेजित का होतात, तेच कळत नाही. त्यांनी याबाबतीत महेंद्रसिंह धोनीचा आदर्श ठेवायला हवा. विजयी षटकार मारल्यानंतरही धोनी तितक्‍यात शांतपणे मैदान सोडायला लागला होता. तुम्हाला आनंद होणे साहजिक आहे, पण, त्या वेळी त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडूला त्रास होता कामा नये. या शिक्षेतून हे खेळाडू लवकरात लवकर काय तो धडा घेतील. कारण, आता आयसीसीनेदेखील याबाबत आपली मार्गदर्शक तत्त्वे कडक केली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition Rohit Sharma Sunil gavaskar