राजस्थान रॉयल्सही विजयाचा मार्ग उघडणार?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 May 2018

काही दिवसांपूर्वी ज्या संघाबरोबर पराभव झाला त्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला पराभूत करून राजस्थान रॉयल्सने आयपीएलमधील आपली गाडी रुळावर आणली. या दुसऱ्या लढतीत त्यांच्यावर काहीसे दडपण आले होते; परंतु केएल राहुलने झुंझार प्रतिकार करूनही राजस्थानने विजय साकारला. आता त्यांना अजून एक शिखर पार करायचे आहे. पिवळ्या जर्सीत खेळणाऱ्या रेड हॉट चेन्नईचा सामना त्यांनी आपल्या गुणवत्तेला पूर्ण न्याय देऊन केला, तर आधीच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही ते धक्कादायक विजय मिळवू शकतात.

राजस्थानची फलंदाजी अजूनही अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. चांगला फिनिशर नसल्यामुळे अपेक्षित धावा त्यांना उभारता आलेल्या नाहीत. गतवर्षाप्रमाणे यंदा बेन स्टोक्‍सला ठसा उमटवता आलेला नाही. बराच काळ तो अव्वल श्रेणी क्रिकेटपासून दूर होता आणि महिन्याभरापूर्वीच तो परतला असल्यामुळे लगेचच फॉर्म सापडणे सोपे नाही, हे अपेक्षित आहे; परंतु त्याच्याकडे असलेल्या क्षमतेमुळे प्रतिस्पर्ध्यांच्या मनात नेहमीच धडकी भरलेली असेल. कारण असे खेळाडू कोणत्याही क्षणी फॉर्मात येऊ शकतात. ज्यो बटलर हा सलामीसाठी भरवशाचा फलंदाज आहे. त्याने काही सामन्यांत जबरदस्त वेगवान सुरवात करून दिलेली आहे. 

काही दिवस मिळालेली विश्रांती चेन्नईसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यापेक्षा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पाठीच्या दुखण्यातून सावरण्यासाठी चांगला वेळ मिळाला; परंतु अशा छोट्या-छोट्या कुरबुरी धोनीला खेळण्यापासून रोख शकत नाहीत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition Sunil Gavaskar