रशीद बहरला तर हैदराबाद इतिहास घडवेल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 May 2018

आयपीएलमध्ये साखळीत पहिले दोन क्रमांक मिळविलेल्या दोन संघांनी अंतिम फेरी गाठणे अगदी सार्थ ठरले आहे. हे दोन्ही संघ निर्णायक क्षणी इतरांपेक्षा कांकणभर सरस होते. त्यामुळे ते यास सर्वार्थाने पात्र आहेत.
साखळीतील दुसरा संघ करंडक जिंकतो असे इतिहास सांगतो. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना आपला लाडका संघ विजयी पुनरागमन करेल, असा विश्‍वास वाटत असेल.

आयपीएलमध्ये साखळीत पहिले दोन क्रमांक मिळविलेल्या दोन संघांनी अंतिम फेरी गाठणे अगदी सार्थ ठरले आहे. हे दोन्ही संघ निर्णायक क्षणी इतरांपेक्षा कांकणभर सरस होते. त्यामुळे ते यास सर्वार्थाने पात्र आहेत.
साखळीतील दुसरा संघ करंडक जिंकतो असे इतिहास सांगतो. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना आपला लाडका संघ विजयी पुनरागमन करेल, असा विश्‍वास वाटत असेल.

चेन्नईने प्ले-ऑफमधील पहिल्या सामन्यात हैदराबादवर रोमहर्षक विजय मिळवून थेट अंतिम फेरी गाठली. प्रतिकूल परिस्थितीमध्येही झुंज देत बाजी मारण्याइतकी क्षमता आणि विश्‍वास आपल्याठायी असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. फॉर्मातील रायुडू याच्याऐवजी फाफला सलामीला पाठविण्याची चाल सुरवातीला धुर्त वाटली नव्हती, पण फाफने ताकदवान फटकेबाजी करीत संघाची नौका पार केली.

चेन्नईच्या फलंदाजीत कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्याची आणि कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता नक्कीच आहे, पण त्यांचा सामना छोटे किंवा मोठे असे कोणतेही आव्हान राखण्याची सवयच झालेल्या प्रतिस्पर्ध्याशी आहे.

हैदराबादच्या फलंदाजीत चेन्नईसारखी क्षमता नाही. धवन आणि विल्यम्सन यांच्यावर ते अवलंबून आहेत. इतरांना प्रसंगानुरूप कामगिरी अजिबात उंचावता आलेली नाही.

हैदराबादचा एक खेळाडू मात्र दिवसागाणिक जास्त चमकतो आहे. कोलकत्याविरुद्ध तर त्याने ‘वन-मॅन आर्मी’ असल्याचे सिद्ध केले. हा खेळाडू म्हणजे रशीद खान! फलंदाजीतील त्याच्या तडाख्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावले. त्याने अफलातून फटके मारले आणि एबी डिव्हिलियर्स याच्या शैलीत मारलेली ‘फ्लीक’ सर्वोत्तम होती. मग चेंडू हातात आल्यानंतर त्याने पुन्हा जादुई मारा केला आणि फलंदाजांची कोंडी केली. इतकेच नव्हे तर त्याने अंतिम टप्प्यात सीमारेषेवर दोन झेल घेतले आणि भन्नाट थ्रोच्या जोरावर धावचीतमध्येही योगदान दिले. ‘उपांत्य’ सामन्यात हैदराबादसाठी रशीदची कामगिरी निर्णायक ठरली. त्याची एनर्जी आणि मुलांमध्ये असतो तसा दांडगा उत्साह संघावर सकारात्मक प्रभाव पाडतो. तो पुन्हा भरात आला तर मग हैदराबादने इतिहास घडविला असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition Sunil Gavaskar