अखेरच्या चेंडूवर मुंबईचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 April 2018

हैदराबाद - ज्या मैदानावर गतवर्षी विजेतेपदाचा करंडक उंचावला त्याच मैदानावर यंदा मुंबईला हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. रोमहर्षक सामना मुंबईने अखेरच्या चेंडूवर गमावला.

हैदराबाद - ज्या मैदानावर गतवर्षी विजेतेपदाचा करंडक उंचावला त्याच मैदानावर यंदा मुंबईला हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. रोमहर्षक सामना मुंबईने अखेरच्या चेंडूवर गमावला.

मुंबईला दोन सामन्यानंतरही गुणांचे खाते उघडता आले नाही. ढेपाळलेली फलंदाजी भोवली. मुंबईला जेमतेम १४७ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादने अर्धशतकी सलामी दिली, तरी मुंबईकर गोलंदाजांनी प्रयत्न सोडले नव्हते. अखेरच्या टप्प्यात हैदराबादचे एकेक फलंदाज बाद करून त्यांची ४ बाद १०७ वरून ९ बाद १३७ अशी अवस्था केली होती; परंतु दीपक हुडाने संयमी खेळ करत अखेरचा फलंदाज स्टॅनलेकच्या साथीत विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना स्टॅनलेकने बेन कटिंग याला विजयी चौकार मारला. हुडा ३२ धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या षटकांत ११ धावांची गरज असताना त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आव्हान कायम ठेवले होते.

हैदराबादचा कर्णधार विल्यम्सनने नाणेफेक जिंकली तेथेच सकारात्मक सुरवात झाली. एविन लेविसने केलेल्या २९ धावा याच मुंबईकडून सर्वाधिक ठरल्या. पहिल्या षटकांत ३ बाद ५४ अशी अवस्था झाली तेथेच त्यांच्या वाटचालीला ब्रेक लागला. त्यानंतर गाडी अडखळतच राहिली. भुवनेश्‍वरकुमार नसूनही हैदराबादच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स - २० षटकांत ८ बाद १४७ (रोहित शर्मा ११, एविन लेविस २९ -१७ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, सूर्यकुमार यादव २८, किएरॉन पोलार्ड २८ -२३ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, संदीप शर्मा २-२५, स्टॅनलनेक २-४२, सिद्धार्थ कौल २-२९) पराभूत विरुद्ध हैदराबाद ः २० षटकांत ९ बाद १५१ (शिखर धवन ४५ -२८ चेंडू, ८ चौकार, दीपक हुडा नाबाद ३२ -२५ चेंडू, १ चौकार, १ षटकार, बुमरा २-३२, मयांक मार्कंडे ४-२३, मुश्‍तफिजुर रेहमान ३-२४).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl premier league Cricket Mumbai Indians sun rise hyderabad