हैदराबादची सुरवातच ‘शिखरा’वरून

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 April 2018

राजस्थान रॉयल्सवर सहज मात, धवनचे वेगवान अर्धशतक
हैदराबाद - गोलंदाजांची शानदार कामगिरी आणि त्यानंतर टोलेबाजी करत शिखर धवनने झळकावलेल्या नाबाद ७७ धावा, असा संगम साधलेल्या सनरायझर्स हैदराबादचा यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्योदय झाला. रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा त्यांनी नऊ विकेटने सहज पराभव केला. 

स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याऐवजी नवे कर्णधार लाभलेल्या या दोन संघात केन विल्यम्सनचा हैदराबाद संघ भारी ठरला. अजिंक्‍य रहाणेच्या राजस्थान रॉयल्सचे अवघ्या १२५ धावांचे लक्ष्य त्यांनी १५.५ षटकांत पार केले. धवनने ५७ चेंडूत नाबाद ७७ धावांचा तडाखा दिला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानकडून संजू सॅमसनचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली. ६ बाद ९६ अशा दारुण अवस्थेत त्यांचा संघ सापडला होता.

डी’आर्च शॉर्ट हा सलामीवर पहिल्याच षटकात धावचीत झाला आणि तेथूनच राजस्थानच्या फलंदाजीची घसरण सुरू झाली. रहाणेला १३ धावाच करता आल्या. त्यानंतर सर्वात भरवशाचा बेन स्टोक्‍स व जॉस बटलर हे इंग्लिश फलंदाज हजेरी लावून परतले. त्यांचे सात फलंदाज एकेरी धावाच करू शकले. हैदराबाद कर्णधार विल्यम्सनने आपल्या गोलदाजांचा खुबीने केलेला वापरही राजस्थानच्या फलंदाजांची कोंडी करणारा ठरला. 

संक्षिप्त धावफलक - राजस्थान रॉयल्स - २० षटकांत ९ बाद १२५ (रहाणे १३, संजू सॅमसन ४९-४२ चेंडू, ५ चौकार, राहुल त्रिपाठी १७, श्रेयस गोपाल १८, शकिब अल हसन २-२३, सिद्धार्थ कौल २-१७, रशिद खान १-२३) पराभूत वि. - सनरायझर्स हैदराबाद - १५.५ षटकांत १ बाद १२७ (शिखर धवन नाबाद ७७-५७ चेंडू, १३ चौकार, १ षटकार, केन विल्यम्सन नाबाद ३६ -३५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, जयदेव उनडकट १-२८)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL premier league cricket rajasthan royals and sun risers hyderabad