पिंक सिटीमध्ये दिल्लीविरुद्ध राजस्थानचे विजयी पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 April 2018

जयपूर - राजस्थान रॉयल्सने पिंक सिटी अशी ओळख असलेल्या जयपूरमध्ये विजयी पुरागमन करताना येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर दिल्लीला दहा धावांनी हरविले. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमावलीचा अवलंब झाला. त्यात दिल्लीला ७१ धावांच्या आव्हानासमोर ४ बाद ६० इतकीच मजल मारता आली. 

राजस्थानने १७.५ षटकांत ५ बाद १५३ धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसाचा व्यत्यय आला. अखेरीस रात्री १२ वाजून २ मिनिटांनी खेळ पुढे सुरु झाला. त्यावेळी दिल्लीला खडतर धावांचे आव्हान मिळाले. त्यांना दोन षटकांचा पॉवर प्ले होता. त्यांची सुरवात धक्कादायक झाली. पहिल्याच चेंडूवर कॉलीन मुन्रो धावचीत झाला. रिषभ पंतने के. गौतमला दोन चौकार मारले. दुसऱ्या षटकात धवलने एक वाईडसह केवळ पाच धावा दिल्या. तिसऱ्या षटकात मॅक्‍सवेलने उनडकडला दोन चौकार व एक षटकार मारला. चौथ्या षटकात मात्र लॉलीनने केवळ सात धावा दिल्या. तेथेच दिल्लीसाठी विजय दुरावला. 

संक्षिप्त धावफलक - राजस्थान - १७.५ षटकांत ५ बाद १५३ (अजिंक्‍य रहाणे ४५-४० चेंडू, ५ चौकार, बेन स्टोक्‍स १६, संजू सॅमसन ३७-२२ चेंडू, २ चौकार, २ षटकार, जॉस बट्‌लर २९, शाहबाझ नदीम ४-०-३४-२, शमी ३.५-०-२९-१) विजयी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स - ६ षटकांत ४ बाद ६० (ग्लेन मॅक्‍सवेल १७, रिषभ पंत २०, ख्रिस मॉरीस नाबाद १७, गौतम १-०-१०-०, धवल कुलकर्णी १-०-४-०, जयदेव उनडकट २-०-२४-१, बेन लॉलीन २-०-२०-२) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl premier league cricket rajasthan royals delhi daredevils