पंजाबचे चक्रव्यूह बंगळूर भेदणार?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 April 2018

बंगळूर - यंदाच्या आयपीएल मोसमाच्या सलामीलाच पराभवाचा धक्का बसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा उद्या (ता. १३) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना होत आहे. पंजाबने मात्र सलामीचा सामना जिंकलेला असल्यामुळे विराट कोहलीच्या बंगळूरला विजयासाठी शर्थ करावी लागणार आहे.

बंगळूर - यंदाच्या आयपीएल मोसमाच्या सलामीलाच पराभवाचा धक्का बसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा उद्या (ता. १३) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना होत आहे. पंजाबने मात्र सलामीचा सामना जिंकलेला असल्यामुळे विराट कोहलीच्या बंगळूरला विजयासाठी शर्थ करावी लागणार आहे.

एकापेक्षा एक सरस खेळाडू संघात असतानाही बंगळूरला भरीव कामगिरी करता आलेली नाही. धडाकेबाज ख्रिस गेलसाठी त्यांनी या वेळी बोली लावली नाही. त्याऐवजी ब्रॅंडम मॅकल्‌मची निवड केली हाच गेल आता पंजाब संघात दाखल झाला आहे. त्याला उद्याच्या सामन्यात संधी मिळाली, तर तो बंगळुरविरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष राहील; परंतु लोकेश राहुल फॉर्मात आल्यामुळे गेलला संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. डेव्हिड मिलरचा अपवाद वगळता नव्याने तयार आलेल्या पंजाबने पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध दिमाखदार विजय मिळवला होता. अश्‍विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने गोलंदाजीत, तर प्रभावी कामगिरी केली होतीच; पण त्यांची फलंदाजी चांगलीच बहरली होती. राहुलने तर वेगवान अर्धशतक केले. त्यानंतर करुण नायरनेही अशीच वेगवान खेळी केली होती. युवराज सिंगला मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. 

कोहलीच्या संघाला पहिल्या विजयासाठी पंजाबचे हे चक्रव्यूह भेदावे लागणार आहे. कोलकताविरुद्ध सलामीच्या सामन्यात त्यांनी चांगली सुरवात केली होती; परंतु एबी डिव्हिल्यर्स आणि स्वतः कोहली लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्यामुळे फलंदाजीतील त्यांची लय बिघडली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl premier league cricket royal challengers bangalore and kings xi punjab