बेन स्टोक्‍सचा धडाका राजस्थानसाठी महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 April 2018

चेन्नईप्रमाणे राजस्थानचे पुनरागमन संस्मरणीय ठरले नाही. केन विल्यम्सनच्या प्रभावी नेतृत्वाखालील हैदराबादसमोर त्यांचा डाव सव्वाशेत आटोपणे धक्कादायक ठरले. केनने चपळाईने झेल घेतले आणि शिखरसह भागीदारीतही योगदान दिले. संजू सॅमसन याच्या उपयुक्त फलंदाजीनंतरही राजस्थानचा डाव स्थिरावला नाही. एक बाद ५२ अशा सुस्थितीनंतरही त्यांची घसरगुंडी उडाली. त्यातच भरवशाचा क्षेत्ररक्षक असा लौकिक असलेल्या अजिंक्‍य रहाणेने धवनचा शून्यावर झेल सोडला. राजस्थानचा पराभव तेथेच नक्की झाला. डावखुऱ्या धवनने मग जखमेवर मीठ चोळले. त्याने ‘सामनावीर’ पुरस्कारही पटकावला. या धक्‍क्‍यातून वेगाने सावरणे राजस्थानला क्रमप्राप्त असेल.

चेन्नईप्रमाणे राजस्थानचे पुनरागमन संस्मरणीय ठरले नाही. केन विल्यम्सनच्या प्रभावी नेतृत्वाखालील हैदराबादसमोर त्यांचा डाव सव्वाशेत आटोपणे धक्कादायक ठरले. केनने चपळाईने झेल घेतले आणि शिखरसह भागीदारीतही योगदान दिले. संजू सॅमसन याच्या उपयुक्त फलंदाजीनंतरही राजस्थानचा डाव स्थिरावला नाही. एक बाद ५२ अशा सुस्थितीनंतरही त्यांची घसरगुंडी उडाली. त्यातच भरवशाचा क्षेत्ररक्षक असा लौकिक असलेल्या अजिंक्‍य रहाणेने धवनचा शून्यावर झेल सोडला. राजस्थानचा पराभव तेथेच नक्की झाला. डावखुऱ्या धवनने मग जखमेवर मीठ चोळले. त्याने ‘सामनावीर’ पुरस्कारही पटकावला. या धक्‍क्‍यातून वेगाने सावरणे राजस्थानला क्रमप्राप्त असेल. त्यांचा तारणहार बेन स्टोक्‍स असून, त्याच्याकडे संघाच्या बाजूने पारडे फिरविण्याची क्षमता आहे. स्टोक्‍सने धडाका लावला तर त्यास यशस्वी प्रत्युत्तर देणारा दिग्गज दिल्लीला शोधावा लागेल. पंजाबविरुद्ध पहिल्या सामन्याच्या तुलनेत दिल्लीला गोलंदाजीत बरीच सुधारणा करावी लागेल. तेव्हा राहुलच्या वेगवान आणि करुण नायरच्या संयमी अर्धशतकानंतर प्रतिआक्रमण रचणे दिल्लीला अशक्‍य ठरले. आयपीएलचा हा प्राथमिक टप्पा आहे. यातून दिसून आलेली बाब म्हणजे अष्टपैलूंचे संघ वर्चस्व राखत आहेत. दुसऱ्या टप्प्यापर्यंत खेळपट्ट्यांना तडे गेलेले असतील. तेव्हा फिरकी गोलंदाज चालतील. साहजिकच पहिल्या टप्प्यात दोनशेचा टप्पा गाठणारे संघ जिंकण्याची शक्‍यता जास्त असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL premier league cricket sunil gavaskar