धोनी सर्वोत्तमच; पण ‘डीके’नेही छाप पाडली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 May 2018

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकांवर असणाऱ्या संघांकडे बघताना चेन्नई हा अन्य तिघांपेक्षा सरस संघ दिसून येतो. बहुतेक निवृत्त खेळाडूंचा समावेस असणाऱ्या या खेळाडूंनी खेळावर अनुभवाचा किती परिणाम होतो हे दाखवून दिले आहे. आपण जेव्हा मैदानावर उतरू तेव्हा आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे हे प्रत्येक खेळाडूच्या मनावर कोरले गेले आहे आणि ते तसे करून दाखवत आहेत. अंबाती रायुडू हा चेन्नईचा सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. तसा तो आयपीएलचा जुना खेळाडू. आठ वर्षे तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पण, हेच वर्ष त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरत आहे.

त्याचबरोबर संघाला हवी तशी गोलंदाजी करू शकलो याचे समाधान सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या गोलंदाजांना निश्‍चित मिळाले असेल. मुंबईविरुद्ध त्यांनी सुरवातीला विकेट मिळविल्या आणि अखेरच्या षटकात त्यांनी फलंदाजांना जखडून ठेवले. बंगळूरला हा विजय नक्कीच यंदाच्या आयपीएल प्रवासाला वळण देणारा ठरावा. डिव्हिलर्स संघात नसताना त्यांनी हा विजय मिळविला आहे. यंदाच्या मोसमात धोनीला कुणी अडवेल असे वाटत नाही.

कोलकता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक (डीके) यानेही संघातील युवा गोलंदाजांवर विश्‍वास दाखवून कर्णधार म्हणून आपली छाप पाडली आहे. अर्थात प्रत्येक वेळी त्याला यश आले असे नाही. पण युवा खेळाडूंना संधी देण्याचे त्याचे नियोजन योग्य आहे. वेगवान गोलंदाज शिवम मावी असो किंवा सुनील नारायण, दोघांवर त्याने दाखविलेला विश्‍वास खूप मोलाचा आहे. आता हे दोन्ही संघ जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा त्यांचे नियोजन वेगळे असेल. अशा वेळी त्यांचे खेळाडू त्या दिवशी कसा खेळ करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

आयपीएल आता अखेरच्या टप्प्यात आले असले, तरी साखळी सामने अजून संपलेले नाहीत. हे टी- २० क्रिकेट आहे. यात काही घडू शकते. क्षेत्ररक्षण, झेल, विक्रमी खेळी, गोलंदाजीतील अचूकता सगळेच कसे विलक्षण होत आहे. सध्या तीन माजी विजेते गुणतक्‍त्यात अखेरच्या पाचमध्ये आहेत. यातील कोणता संघ प्ले-ऑफमध्ये येतो ही पाहण्याची मजा काही वेगळीच असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL premier league cricket vivian-richards