खेळाडूंच्या दुखापतीचे चेन्नईसमोर प्रश्‍नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 April 2018

चेन्नई - मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना अखेरच्या क्षणी जिंकून दोन वर्षांनी आयपीएलचे पुनरागमन साजरे करणाऱ्या चेन्नई सुपर किंगसमोर उद्या घरच्या मैदानावर कोलकता नाईटरायडर्सचे आव्हान आहे. दोघांनीही विजयाने सुरवात केली असली तरी चेन्नईला खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्‍नचिन्ह भेडसावत आहे.

चेन्नईत दोन वर्षांनंतर उद्या पहिला सामना होत आहे. घरच्या प्रेक्षकांना विजयी भेट देण्यासाठी महेंद्रसिंग धोनीचा संघ सज्ज असला तरी फाफ डुप्लेसी आणि आता आयपीएलमधून बाहेर गेलेला केदार जाधव यांना झालेल्या दुखापतीमुळे चेन्नईसमोर संघ निवडीचा प्रश्‍न आहे. मुंबईविरुद्ध ब्रावोने केलेल्या अफलातून खेळीमुळे चेन्नईचा आत्मविश्‍वास वाढला असला तरी कोलकताचा संघ तेवढाच तगडा आहे.चेन्नईने मिळवलेल्या विजयाच्या तुलनेत कोलकता संघाने रविवारी ताकदवर रॉयल चॅलेंजर बंगळूरसंघाचा सहज पराभव केला.

दिनेश कार्तिक या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकताने गोलंदाजी आणि फलंजीतही प्रभाव पाडला होता. कार्तिकचे नेतृत्वही लक्षवेधक ठरले होते. विराट कोहली आणि डिव्हिल्यर्स यांची जमलेली जोडी फोडण्यासाठी त्याने प्रमुख गोलंदाजांऐवजी नितीश राणाला गोलंदाजी देण्याची चाल चांगलीच यशस्वी ठरली होती.फिरकी गोलंदाजाची प्रमुख जबाबदारी असली तरी सुनील नारायण सलामीला येऊन कसलेल्या फलंदाजांपेक्षा चांगली टोलेबाजी करण्याची क्षमता बाळगून आहे. त्याच्या वेगवान अर्धशतकाचा बंगळूरला तडाखा बसला होता. त्यामुळे चेन्नईसमोर नारायणलाही रोखण्याचे आव्हान असेल. एकूणच उद्याच्या सामन्यात कोलकताचे पारडे जड असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL premier league criekct player injured chennai super kings