रायुडूच्या खेळातील सातत्य कमालीचे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

पराभव विसरून नव्याने पुन्हा विजयाच्या मार्गावर येणे हे संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. चेन्नई सुपर किंग्जने हे करून दाखवले. मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यावर त्यांनी दिल्लीविरुद्ध नव्या सलामीच्या जोडीसह जबरदस्त प्रदर्शन केले. मुंबईविरुद्धचा पराभव विसरून जात त्यांनी दिल्लीविरुद्ध सहज विजय मिळविला. फलंदाजीचा क्रम बदलल्यानंतरही अंबाती रायुडूच्या खेळावर परिणाम झाला नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात आपण कसे उपयुक्त फलंदाज आहोत, हेच त्याने दाखवून दिले.

धावांचा वेग कसा आणि कधी वाढवायचा, तसेच कुठल्या चेंडूवर एकेरी, दुहेरी धावा घ्यायचे, हे तो चांगले जाणतो. याचमुळे चेन्नईची ताकद वाढते. धोनीदेखील फॉर्ममध्ये असल्यामुळे चेन्नईला कुठल्याही धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विश्‍वास मिळाला आहे. शेन वॉटसन आणि सुरेश रैना हेदेखील त्यांच्या फलंदाजीतील खोली वाढवतात. गोलंदाजी या एकाच आघाडीवर चेन्नईला अन्य संघांप्रमाणे चिंता आहे. अर्थात, याला सनरायझर्स हैदराबादचा अपवाद आहे. पॉवर प्ले आणि अखेरच्या षटकातील गोलंदाजीत सध्या तरी त्यांचा हात धरणारा कुणी नाही. त्यांच्या गोलंदाजांनी एकदा नव्हे, तर तीनदा संघाच्या कमी धावांचा बचाव केला आहे. 

कोलकाता नाइट रायडर्सची गोलंदाजीदेखील समतोल आहे. फलंदाजांना ते सहजतेने फटकेबाजीस मोकळीक देत नाहीत. कर्णधार कार्तिक वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा चांगला उपयोग करून घेताना दिसतो. पहिल्या दोन सामन्यात त्याचे निर्णय चुकले होते; पण नंतर तो चांगला स्थिरावला. त्यांची फलंदाजीदेखील चांगली होत आहे. बंगळूरविरुद्धच्या विजयात ख्रिस लीन खेळपट्टीवर टिकून उभा राहिला. शुभमन गिल या युवा फलंदाजानेदेखील संधी मिळाल्यावर आपली छाप पाडली आहे. शॉर्ट पिच गोलंदाजी होत असेल, तर नारायण हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

ईडन गार्डन मैदान कोलकतासाठी तारक ठरले आहे. त्यामुळे आता ते धोनीची मक्तेदारी मोडू शकतात का? हेच पाहायचे.

Web Title: IPL premier league sunil gavaskar ambati rayudu cricket