राजस्थान रॉयल्सचा चेन्नई एक्‍स्प्रेसला 'ब्रेक' 

वृत्तसंस्था
Saturday, 12 May 2018

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला 4 बाद 176 असे रोखल्यानंतर राजस्थानने 19.5 चेंडूंत 6 बाद 177 धावा केल्या. तीन चौकारांनी डावाची सुरवात करताना बटलरने षटकाराने राजस्थानचा विजय सुकर केला. त्याने 60 चेंडूंत 11 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 95 धावा केल्या. आवश्‍यक धावगती वाढल्यावर मोक्‍याच्या वेळी के. गौतमची 4 चेंडूंतील 13 धावांची खेळीही महत्त्वपूर्ण ठरली. 

जयपूर : दडपणाखाली अखेरच्या चेंडूपर्यंत टिकून राहिलेल्या जोस बटलरच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी आयपीएलमध्ये चेन्नई एक्‍स्प्रेसला "ब्रेक' लावला. राजस्थानने चार गडी राखून विजय मिळवत आपल्या आव्हानातील हवा कायम ठेवली. 

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला 4 बाद 176 असे रोखल्यानंतर राजस्थानने 19.5 चेंडूंत 6 बाद 177 धावा केल्या. तीन चौकारांनी डावाची सुरवात करताना बटलरने षटकाराने राजस्थानचा विजय सुकर केला. त्याने 60 चेंडूंत 11 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 95 धावा केल्या. आवश्‍यक धावगती वाढल्यावर मोक्‍याच्या वेळी के. गौतमची 4 चेंडूंतील 13 धावांची खेळीही महत्त्वपूर्ण ठरली. 

त्यापूर्वी, सुरेश रैनाचे अर्धशतक आणि शेन वॉटसन, महेंद्रसिंह धोनी यांच्या उपयुक्त खेळीमुळे चेन्नईने पावणेदोनशेची मजल मारली. 

संक्षिप्त धावफलक ः चेन्नई 20 षटकांत 4 बाद 176 (सुरेश रैना 52 -35 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, वॉटसन 39, धोनी नाबाद 33, जोफ्रा आर्चर 2-42) पराभूत वि. राजस्थान 19.5 षटकांत 6 बाद 177 (जोस बटलर नाबाद 95 -60 चेंडू, 11 चौकार, 2 षटकार, सॅमसन 21, बिन्नी 22, गौतम 13). 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Rajasthan Royals beat Chennai Super Kings