esakal | डिव्हिलर्सची तुफान फटकेबाजी; बंगळूरचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

AB Devilliers

डिव्हिलर्सची तुफान फटकेबाजी; बंगळूरचा विजय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवामुळे कमालीचा निराश झालेल्या विराट कोहलीच्या चेहऱ्यावर अखेर हास्य उमटले. त्याच्या बंगळुर संघाने दिल्लीचा सहा विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधले आव्हान जिवंत केले. स्वतः विराटला मोठी खेळी करता आली नसली तरी डिव्हिलर्सने संघाचे तारू पैलतिरी लावले.

गोलंदाजीतील कमकूवतपणा बंगळुरला आत्तापर्यंत भोवलेला आहे. आजही तशीच काहीशी परिस्थिती होती. दिल्लीची 2 बाद 23 अशी अवस्था करूनही त्यांना 175 धावांचे आव्हान मिळाले होते. पण सर्व कोनात फटकेबाजी करण्याची खासियत असलेल्या डिव्हिल्यर्सने आज विराटला निराश केले नाही. त्याने 39 चेंडूतच नाबाद 90 धावांची खेळी केली. विराट कोहलीनेही चांगली सुरुवात केली होती, परंतु बोल्टने सीमारेषेवर जबदरस्त खेळ करून विराटची 30 धावांची खेळी संपुष्टात आणली त्यानंतर डिव्हिल्यर्सने खेळाची सुत्रे आपल्या हाती घेतली. 12 चेंडू शिल्लक असतानाच बंगळुरने विजय मिळवला. 

तत्पूर्वी, दिल्लीने रॉय आणि गंभीर यांना झटपट गमावल्यानंतर रिषभ पंतने 85 धावांची वेगवान खेळी साकार केली. एकवेळ अशी होती की दिल्लीला दीडशे धावांचा टप्पा कठीण वाटत होता, परंतु सहा चौकार आणि सात षटकार मारणाऱ्या पंतला मुंबईकर श्रेयस अय्यरने मोलाची साथ दिली. अय्यरने 31चेंडूत 52 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक : दिल्ली : 20 षटकांत 5 बाद 174 (श्रेयस अय्यर 52 -31 चेंडू, 4 चौकार, 3 षटकार, रिषभ पंत 85-48 चेंडू, 6 चौकार 7 षटकार, तेवाटिया नाबाद 13- 9 चेंडू, 3 षटकार, चहल 2-22, अँडरसन 1-10 ) पराभूत वि. बंगळुर 18 षटकांत 4 बाद 176(विराट कोहली 30 -26 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, एबी डिव्हिलर्स नाबाद 90 -39 चेंडू, 10 चौकार, 5 षटकार, बोल्ट 1-33) 

loading image