आयपीएल लिलावात भारतीय खेळाडूंना जास्त 'डिमांड' 

वृत्तसंस्था
Sunday, 28 January 2018

स्टोक्‍सला सर्वाधिक 
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्‍सला सर्वाधिक भाव मिळणार हे उघड होते. त्यानुसार त्याला राजस्थान रॉयल्सने 12 कोटी 50 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले; परंतु स्टोक्‍ससाठी ही रक्कम दोन कोटींनी कमी आहे. गत वर्षी पुण्याने त्याच्यासाठी 14.50 कोटी मोजले होते. बारमध्ये मद्यपान करून मारहाण केल्याबद्दल स्टोक्‍सला इंग्लंड संघातून वगळण्यात आले होते; परंतु त्याच्यावर खटला सुरू आहे. 

मुंबई : केवळ भारतीयच नव्हे, तर क्रिकेट विश्‍वातील सर्वच खेळाडूंची उत्सुकता असलेल्या आयपीएलच्या नव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात सर्वाधिक रक्कम इंग्लंडचा वादग्रस्त अष्टपैलू बेन स्टोक्‍स्‌ला 12 कोटी 50 लाख रुपये मिळाले असले तरी भारतीय खेळाडूंसाठी अधिक मागणी होती. केएल राहुल आणि मनीष पांडे यांना प्रत्येकी 11 कोटी मिळाले; मात्र वादळी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलसह ज्यो रूट, हाशिम आमला, मलिंगा, फॉक्‍नर यांच्यासाठी कोणीही बोली लावली नाही. 

पहिल्या आयपीएलच्या अगोदर झालेल्या लिलावानंतर आज प्रथमच मोठा लिलाव पार पडला. प्रत्येक संघांनी प्रमुख खेळाडू रिटेन केल्यानंतर उर्वरित खेळाडू लिलावाच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे काही मोठे अदलाबदल पाहायला झाले. कोलकता नाईटरायडर्सला विजेतेपद मिळवून देणारा गौतम गंभीर आता पुन्हा दिल्ली संघातून खेळणार आहे. "मुंबईकर' राहिलेला हरभजन सिंग आता धोनीच्या चेन्नई संघात सेवेत दाखल झाला आहे, तर चेन्नईला अश्‍विन "पंजाब'वासीय झाला आहे. 

स्टोक्‍सला सर्वाधिक 
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्‍सला सर्वाधिक भाव मिळणार हे उघड होते. त्यानुसार त्याला राजस्थान रॉयल्सने 12 कोटी 50 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले; परंतु स्टोक्‍ससाठी ही रक्कम दोन कोटींनी कमी आहे. गत वर्षी पुण्याने त्याच्यासाठी 14.50 कोटी मोजले होते. बारमध्ये मद्यपान करून मारहाण केल्याबद्दल स्टोक्‍सला इंग्लंड संघातून वगळण्यात आले होते; परंतु त्याच्यावर खटला सुरू आहे. 

मॅक्‍सवेलची लॉटरी 
तडाखेबंद फलंदाजीची क्षमता असली तरी भरवसा नसल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघातही स्थान नसलेला ग्लेन मॅक्‍सवेल गतवर्षी पंजाबचा कर्णधार होता; परंतु तो दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला होता. रिकी पॉंटिंग प्रशिक्षक असलेल्या दिल्लीने त्यासाठी नऊ कोटी मोजले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी प्रशिक्षक असलेल्या हैदराबादनेही त्याच्यासाठी स्पर्धा केली होती. 

राहुल, मांडे मालामाल 
एकीकडे परदेशी खेळाडूंना अपेक्षेऐवढी किंमत मिळत नसताना सर्व फ्रॅंचाईसने भारतीय खेळाडूंवरच अधिक भर दिला. त्यामध्ये केएल राहुल आणि मनीष पांडे यांना प्रत्येकी 11 कोटी मिळाले. स्टोक्‍स्‌नंतरही ही दुसऱ्या क्रमांकाची रक्कम आहे. आयपीएलची सुरवात पंजाब संघातून करणारा युवराज पुन्हा याच संघातून खेळणार आहे; परंतु आता त्याच्यासाठी दोन कोटीच रुपये मोजण्यात आले. बंगळूर संघाने त्याच्यासाठी काही वर्षांपूर्वी 15 कोटी मोजले होते. 

गेलसाठी बोलीच नाही 
ख्रिस गेल काही वर्षांपासून आयपीएलचा प्रमुख घटक राहिलेला आहे. स्फोटक फलंदाजीने त्याने अनेक मैदाने गाजवली आहेत; परंतु यंदा संघरचनेत त्याला बंगळुरू संघाने स्थान तर दिले नाहीच; पण इतर कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली लावली नाही. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट, अष्टपैलू जेम्स फॉक्‍नर आणि मार्टिन गुप्तिल यांना कोणीही आपल्या संघात घेतले नाही. उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या लिलावासाठी हे "अनसोल्ड' खेळाडू उपलब्ध असतील. 

पोलार्ड, कुणाल मुंबई संघात 
मुंबई इंडियन्सने किएरॉन पोलार्ड आणि कुणाल पंड्या यांना "राईट टू मॅच' कार्डद्वारे आपल्या संघात कायम राखले; परंतु यष्टीरक्षक मिळवण्यासाठी त्यांची दमछाक झाली. पार्थिव पटेलसाठी बोली लावली नाही. त्यानंतर वृद्धिमन साहा, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, रॉबीन उथप्पा यांच्यासाठी स्पर्धा केली. अखेर "अनकॅप्ड'मधून इशान किशानला आपल्या संघात घेतले. 

आकडेवारी 
- 109 खेळाडूंचा लिलाव, 78 जणांची खरेदी, 31 अनसोल्ड 
- 19 वर्षांखालील कर्णधार पृथ्वी शॉला 1.20 कोटी 
- ताशी 150 कि. मी. वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला 19 वर्षांखाली वेगवान गोलंदाज नागरकोटीसाठी 3.20 कोटी 
- आजच्या लिलावानंतर उर्वरित आणि अनसोल्ड खेळाडूंमधून कोणकोणते खेळाडू हवेत याची यादी सर्व फ्रॅंचाईस देणार आणि त्यानुसार उद्या "ते' खेळाडू विकत घेणार. 

आयपीएलचे प्राथमिक संघ आणि लिलावात मिळालेली रक्कम (कोटींमध्ये) 
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रित बुमरा, कुणाल पंड्या (8.8) , किएरॉन पोलार्ड (5.4), मश्‍तफिजुर (2.2) रहिम, पॅट कमिंस (5.4), सूर्यकुमार यादव (3.2), इशान किशान (6.2) 

चेन्नई : महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ ड्युप्लेसी (1.60), हरभजन सिंग (2), ड्‌वेन ब्रावो (6.40), शेन वॉटसन (4), केदार जाधव (7.80), अंबाती रायडू (2.2), इम्रान ताहीर (1), कर्ण शर्मा (5). 

दिल्ली : रिषभ पंत, ख्रिस मॉरिस श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्‍सवेल (9), गौतम गंभीर (2.80), जेसन रॉय (1.50), कॉलिन मुन्रो (1.90), महंमद शमी (3), कागिसो रबाडा (4.2) , अमित मिश्रा (4), पृश्‍वी शॉ (1.2), राहुल तेवाटिया (3), विजय शंकर (3.2), हर्षल पटेल (20 लाख), अवेश खान (70 लाख) 

पंजाब : अक्षर पटेल, आर. अश्‍विन (7.60), युवराज सिंग (2), करुण नायर (5.60), केएल राहुल (11), डेव्हिड मिलर (3), ऍरॉन फिन्च (6.20), मार्कस स्टॉनिस (6.20), मयांक अगरवाल (1) , अनिकेत राजपूत (3). 

कोलकता : सुनील नारायण, आंद्रे रसेल, मिशेल स्टार्क (9.4), ख्रिस लीन (9.6), दिनेश कार्तिक 7.4), रॉबीन उथप्पा (6.4), पीयूष चावला (4.2), कुलदीप यादव (5.8), शुभम गिल (1.8), इशांक जग्गी, कमलेश नागरकोटी (3.2), नितीश राणा (3.2). 

राजस्थान : स्टीव स्मिथ, बेन स्टोक्‍स, अजिंक्‍य रहाणे (4), स्टूअर्ट बिन्नी (50 लाख), संजू सॅमसन, जोस बटलर (4.4), राहुल त्रिपाठी (3.4), डिऍर्ची शॉर्ट (4), जोफा आर्चर (7.2) 

बंगळूर : विराट कोहली, एबी डिव्हिल्यर्स, सर्फराझ खान, ब्रॅंडन मॅकल्‌म (3.6), ख्रिस वोक्‍स (7.4), ग्रॅंडहोम (2.2), मोईन अली (1.7), क्विन्टन डिकॉक (2.8), उमेश यादव (4.2), यजुवेंदर चहल (6), मनन होरा (1.1), कुलवंत खेजरोलिया (85 लाख), अनिकेत चौधरी (30 लाख), नवदीप सैनी (3). 

हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्‍वर कुमार, शिखर धवन, केन विलिमसन (3), शकिब अल हसन (2), मनीष पांडे (11), कार्लोस ब्रॅथवेट (2), युसूफ पठाण (1.9), वृद्धिमान साहा (5), रशिद खान (9), रिकी भूई (20लाख), दीपक हुडा (3.6), सिद्धार्थ कौल (3.8), टी. नटराजन (40 लाख), बसिल थंपी (95 लाख), खलिल अहमद (3) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPLAuction IPL cricket news Ben Stokes R Ashwin Chris Gayle Bangalore auction