कसोटी खेळणारा आयर्लंड 11वा देश

गंगाराम सपकाळ 
Thursday, 10 May 2018

प्रत्येक देशाचे कसोटी पदार्पण 
-ऑस्ट्रेलिया 15 मार्च 1877 (वि. इंग्लंड, मेलबर्न) 
-इंग्लंड 15 मार्च 1877 (वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न) 
-दक्षिण आफ्रिका 12 मार्च 1889 (वि. इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ) 
-वेस्ट इंडीज 23 जून 1928 (वि. इंग्लंड, लॉर्डस) 
-न्यूझीलंड 10 जानेवारी 1930 (वि. इंग्लंड, ख्राईस्टचर्च) 
-भारत 25 जून 1935 (वि. इंग्लंड, लॉर्डस) 
-पाकिस्तान 16 ऑक्‍टोबर 1952 (वि. भारत, दिल्ली) 
-श्रीलंका 17 फेब्रुवारी 1982 (वि. इंग्लंड, कोलंबो) 
-झिंबाब्वे 18 ऑक्‍टोबर 1992 (वि. भारत, हरारे) 
-बांगलादेश 10 नोव्हेंबर 2000 (वि. भारत, ढाका) 
-आयर्लंड 11 मे 2018 (वि. पाकिस्तान, डब्लिन) 

पुणे - कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शुक्रवारी (ता. 11) आयर्लंड देशाचे नाव नव्याने जोडले जाणार आहे. आयर्लंड शुक्रवारपासून पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळेल. कसोटी पदार्पण करणारा आयर्लंड 11वा देश ठरेल. 
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत दहा देशांनाच कसोटी खेळण्याचा दर्जा होता. आता एका महिन्याच्या अंतराने यात दोन देशांची भर पडणार आहे. प्रथम आयर्लंड आणि पाठोपाठ 35 दिवसांत अफगाणिस्तान (14 जून) भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळेल. 
इतिहासात पहिला कसोटी सामना खेळण्याचा मान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मिळाला. त्यांनी 15 मार्च 1847 मध्ये हा पहिला सामना खेळला. त्यानंतर अकरा वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने पदार्पण केले; पण काही वर्षांतच वंशभेदाच्या वादात त्यांच्यावर बंदी टाकण्यात आली. भारताने 25 जून 1935मध्ये कसोटी पदार्पण केले. क्रिकेटचे जनक मानल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्ध सहा देशांनी पदार्पण केले. पाकिस्तान, झिंबाब्वे, बांगलादेश संघांनी भारताविरुद्ध पदार्पण केले आहे. 

प्रत्येक देशाचे कसोटी पदार्पण 
-ऑस्ट्रेलिया 15 मार्च 1877 (वि. इंग्लंड, मेलबर्न) 
-इंग्लंड 15 मार्च 1877 (वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न) 
-दक्षिण आफ्रिका 12 मार्च 1889 (वि. इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ) 
-वेस्ट इंडीज 23 जून 1928 (वि. इंग्लंड, लॉर्डस) 
-न्यूझीलंड 10 जानेवारी 1930 (वि. इंग्लंड, ख्राईस्टचर्च) 
-भारत 25 जून 1935 (वि. इंग्लंड, लॉर्डस) 
-पाकिस्तान 16 ऑक्‍टोबर 1952 (वि. भारत, दिल्ली) 
-श्रीलंका 17 फेब्रुवारी 1982 (वि. इंग्लंड, कोलंबो) 
-झिंबाब्वे 18 ऑक्‍टोबर 1992 (वि. भारत, हरारे) 
-बांगलादेश 10 नोव्हेंबर 2000 (वि. भारत, ढाका) 
-आयर्लंड 11 मे 2018 (वि. पाकिस्तान, डब्लिन) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ireland is a 11th country to playing Test matches