गोलंदाज अँडरसनचे लॉर्डसवर शतक

वृत्तसंस्था
Monday, 13 August 2018

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने रविवारी क्रिकेट पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ऐतिहासिक शतकी कामगिरी केली. लॉर्डसच्या मैदानावर विकेटचे शतक गाठणारा अँडरसन पहिला गोलंदाज ठरला. 
 

लंडन- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने रविवारी क्रिकेट पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ऐतिहासिक शतकी कामगिरी केली. लॉर्डसच्या मैदानावर विकेटचे शतक गाठणारा अँडरसन पहिला गोलंदाज ठरला. 

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात रविवारी अँडरसनने भारताच्या दुसऱ्या डावात मुरली विजयला शून्यावरच बाद करून ही अनोखी कामगिरी केली. लॉर्डसच्या मैदानावर सलग तीन सामन्यांत शतक झळकाविणाऱ्या फलंदाजांच्या नोंदी आढळतील. पण या मैदानावर गोलंदाजांने विकेटचे शतक पूर्ण करण्याची ही पहिलीच घटना घडली. 

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर शंभर विकेट घेण्याची ही क्रिकेट विश्‍वातील दुसरीच घटना घडली. यापूर्वी कसोटीत सर्वाधिक 800 विकेट मिळविणारा श्रीलंकेचा ऑफ स्पिनर मुरलीधरन याने गॉल आणि सिंहली स्पोर्टस क्‍लब अशा दोन मैदानांवर ही कामगिरी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: James Anderson first bowler to take 100 Test wickets at Lords