भारत दौऱ्यासाठी अँडरसनचा सहभाग अनिश्‍चित

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

चितगांव : पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या भारत दौऱ्याविषयी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा सहभाग संदिग्ध मानला जात आहे. अँडरसन खांद्याच्या दुखापतीमुळे बेजार असून, त्याला बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आहे. इंग्लंड संघ नोव्हेंबरमध्ये पाच कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

चितगांव : पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या भारत दौऱ्याविषयी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा सहभाग संदिग्ध मानला जात आहे. अँडरसन खांद्याच्या दुखापतीमुळे बेजार असून, त्याला बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आहे. इंग्लंड संघ नोव्हेंबरमध्ये पाच कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

बांगलादेशविरुद्धची इंग्लंडची कसोटी उद्यापासून (गुरुवार) सुरू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूक म्हणाला, "भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अँडरसन उपलब्ध नसेल. कदाचित तोपर्यंत अँडरसन सराव करू लागला असेल; पण संघातील त्याच्या समावेशाबाबतचा निर्णय पुढील आठवड्यानंतरच घेतला जाईल. मी काल रात्री त्याच्याशी बोललो. आता त्याने तंदुरुस्तीसाठी व्यायाम सुरू केला आहे; पण अद्याप गोलंदाजी केलेली नाही. काही महिन्यांपूर्वीही अशीच समस्या उद्‌भवली होती. विश्रांतीच्या कालावधीत त्याला त्रास होत नाही; पण गोलंदाजी सुरू केल्यानंतर दुखापत पुन्हा उफाळून येते.''

दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध अँडरसन खेळणार नसला, तरीही आगामी भारत दौरा लक्षात घेता इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने त्याला बांगलादेशमध्येच संघात दाखल होण्यास सांगितले होते. पण आता अँडरसन पूर्ण तंदुरुस्त नसल्याने यासंदर्भातील निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. 2012 मध्ये इंग्लंडने भारतामध्ये कसोटी मालिकेत विजय मिळविला होता. त्यावेळी 'अँडरसन हाच दोन्ही संघांमधील निर्णायक फरक होता' अशी प्रतिक्रिया भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली होती.

इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम:

 • 9 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर : पहिली कसोटी, राजकोट
 • 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर : दुसरी कसोटी, विशाखापट्टणम
 • 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर : तिसरी कसोटी, चंडिगड
 • 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर : चौथी कसोटी, मुंबई
 • 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर : पाचवी कसोटी, चेन्नई

 

 • 15 डिसेंबर : पहिली वन-डे, पुणे
 • 19 जानेवारी : दुसरी वन-डे, कटक
 • 22 जानेवारी : तिसरी वन-डे, कोलकाता

 

 • 26 जानेवारी : पहिली ट्‌वेंटी-20, कानपूर
 • 29 जानेवारी : दुसरी ट्‌वेंटी-20, नागपूर
 • 1 फेब्रुवारी : तिसरी ट्‌वेंटी-20, बंगळूर
Web Title: James Anderson set to miss first test against India in November