जर्सी पाकिस्तानची, नाव अन्‌ नंबर धोनीचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानचा एक चाहता चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या वन-डे संघातील क्रिकेटपटूंची जर्सी घातली आहे. ही जर्सी अशासाठी विशेष आहे, की मागील बाजूस धोनी असे नाव असून त्याचा नंबर सातही आहे. अलीकडेच आसाममध्ये एका सामन्यादरम्यान शाहीद आफ्रिदीच्या नावाची जर्सी घातल्याबद्दल स्थानिक पोलिसांनी रिपोन चौधरी नामक चाहत्याला ताब्यात घेतले होते. त्यावर आफ्रिदीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. क्रिकेटवरून राजकारण खेळले जाणे वाईट असल्याचे तो म्हणाला होता. जानेवारीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील ओकारा येथे उमर दराझ नामक पाक चाहता चर्चेत आला होता.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानचा एक चाहता चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या वन-डे संघातील क्रिकेटपटूंची जर्सी घातली आहे. ही जर्सी अशासाठी विशेष आहे, की मागील बाजूस धोनी असे नाव असून त्याचा नंबर सातही आहे. अलीकडेच आसाममध्ये एका सामन्यादरम्यान शाहीद आफ्रिदीच्या नावाची जर्सी घातल्याबद्दल स्थानिक पोलिसांनी रिपोन चौधरी नामक चाहत्याला ताब्यात घेतले होते. त्यावर आफ्रिदीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. क्रिकेटवरून राजकारण खेळले जाणे वाईट असल्याचे तो म्हणाला होता. जानेवारीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील ओकारा येथे उमर दराझ नामक पाक चाहता चर्चेत आला होता. विराट कोहलीचा फॅन असल्याचे जाहीर करत त्याने घरावर तिरंगा झळकाविला होता. त्याबद्दल अटक करून त्याला दहा वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मेलबर्नमधील या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाला. हा फोटो पोस्ट करून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भारत-पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका पुन्हा सुरू व्हाव्यात, अशी प्रतिक्रियाही एका चाहत्याने व्यक्त केली आहे.

Web Title: Jersey Pakistan, Dhoni's name and number