झारखंडला निर्णायक विजयाची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

इशांक जग्गीचे शतक, गुजरातची दुसऱ्या डावात घसरगुंडी
नागपूर - झारखंडने रणजी करंडक उपांत्य सामन्यावरील पकड भक्कम करीत गुजरातविरुद्ध निर्णायक विजयाची संधी मिळविली आहे. पहिल्या डावातील आघाडीची शर्यत जिंकल्यानंतर झारखंडने गुजरातची दुसऱ्या डावात 4 बाद 100 अशी दुरवस्था केली. इशांक जग्गीचे शतक आणि आर. पी. सिंगच्या सहा विकेट हे आजचे वैशिष्ट्य ठरले.

इशांक जग्गीचे शतक, गुजरातची दुसऱ्या डावात घसरगुंडी
नागपूर - झारखंडने रणजी करंडक उपांत्य सामन्यावरील पकड भक्कम करीत गुजरातविरुद्ध निर्णायक विजयाची संधी मिळविली आहे. पहिल्या डावातील आघाडीची शर्यत जिंकल्यानंतर झारखंडने गुजरातची दुसऱ्या डावात 4 बाद 100 अशी दुरवस्था केली. इशांक जग्गीचे शतक आणि आर. पी. सिंगच्या सहा विकेट हे आजचे वैशिष्ट्य ठरले.

गुजरातच्या 390 धावसंख्येसमोर झारखंडने निम्मा संघ 214 धावांत गमावला होता. त्यांनी 408 धावांपर्यंत मजल मारली. प्रतिस्पर्ध्याला 18 धावांची अल्प आघाडी मिळाल्यानंतर गुजरातकडून भक्कम खेळ अपेक्षित होता; मात्र फॉर्मात असलेला प्रियांक पांचाळ धावचीत झाला. कर्णधार पार्थिव पटेल जेमतेम खाते उघडू शकला, तर विक्रमवीर गोहेलचे अर्धशतक एका धावेने हुकले. शाहबाझ नदीमने तीन विकेट टिपल्या.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या जग्गीने शतकी धमाका करून सामन्याचे चित्रच पालटवून टाकले. 27 वर्षीय जग्गीने यंदाच्या मोसमातील चौथे शतक झळकविताना 129 धावांची (182 चेंडू, 15 चौकार, 1 षटकार) खेळी करून गुजरातच्या आशेवर पाणी फेरले. इशांकला मधल्या फळीतील कौशल सिंग (53 धावा, 92 चेंडू, 8 चौकार, 1 षट्‌कार), राहुल शुक्‍ला व शाहबाज नदीमयांची मोलाची साथ लाभली.

जग्गीने कौशलसोबत सातव्या विकेटसाठी जोडलेल्या 98 धावा झारखंडला आघाडी मिळवून देण्यात निर्णायक ठरल्या. आर. पी. सिंगने 90 धावांत सर्वाधिक सहा गडी बाद करून झारखंडला रोखण्याचा प्रयत्न केला.

खेळपट्‌टीचा एकूणच कल लक्षात घेता सामना चौथ्याच दिवशी संपला तर आश्‍चर्य वाटायला नको.

संक्षिप्त धावफलक
गुजरात पहिला डाव : 390. झारखंड पहिला डाव : (5 बाद 214 वरून) 102 षटकांत सर्वबाद 408 (इशांक जग्गी 129, इशान किशन 61, कौशल सिंग 53, सौरभ तिवारी 39, विराट सिंग 34, राहुल शुक्‍ला 27, प्रत्युष सिंग 27, शाहबाज नदीम 16, आर. पी. सिंग 6-90, हार्दिक पटेल 2-108, रुजुल भट्‌ट 1-57, जसप्रीत बुमराह 1-103).

गुजरात दुसरा डाव : 37 षट्‌कांत 4 बाद 100 (समित गोहिल 49, भार्गव मेराई 44, शाहबाज नदीम 3-36).

धोनीमुळे प्रेरणा
एखाद्या संघाला वरिष्ठ खेळाडूचे मार्गदर्शन व उपस्थितीचा किती फायदा होऊ शकतो, याचा प्रत्यय विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर मंगळवारी आला. गुजरातने चारशेच्या जवळपास धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस झारखंड बॅकफूटवर होता. मात्र, "मेंटॉर' महेंद्रसिंग धोनीच्या सहवासाने प्रेरित झालेल्या झारखंडच्या फलंदाज व गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी पारडे फिरविले.

Web Title: jharkhand & gujrat ranaji karandak cricket match