भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ घोषित

पीटीआय
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

वेलिंग्टन - भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने संघ घोषित केला असून, या संघात जिमी निशमचा समावेश केला आहे. 

निशमने आपला अखेरचा कसोटी सामना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो दुखापतीने त्रस्त होता. 25 वर्षीय निशमने न्यूझीलंडसाठी आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. पाठीच्या दुखापतीने तो त्रस्त होता. अखेर देशांतर्गत स्पर्धांमध्ये तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतर त्याचा राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. तो नुकताच कौंटी क्रिकेटमध्ये डर्बीशायर संघाकडून खेळला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मॅट हेन्री व जीत रावल यांना वगळण्यात आले आहे. तीन कसोटी सामन्यांपूर्वी न्यूझीलंडचा संघ एक सराव सामनाही खेळणार आहे. 22 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेस सुरवात होत आहे.

संघ पुढीलप्रमाणे - केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, मार्क क्रेग, मार्टीन गुप्टील, टॉम लॅटम, जिमी निशम, हेन्री निकोल्स, ल्युक रॉंची, मिशेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊथी, रॉस टेलर, नील वेग्नर, बी. वेट्लिंग.

Web Title: Jimmy Nisham in for New Zealand Cricket team for India tour