रॉय, बटलरच्या खेळीने इंग्लंडचा दुसरा विजय

वृत्तसंस्था
Monday, 18 June 2018

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड 8 बाद 342 (जेसन रॉय 102, जोस बटलर नाबाद 91, जॉनी बेअरस्टॉ 42, रिचर्डसन 2-64, केन रिचर्डस्‌न 2-56, ऍण्ड्रॅयू टाय 2-81) वि.वि. ऑस्ट्रेलिया 47.1 षटकांत 304 (शॉन मार्श 131, ऍश्‍टन ऍगर 46, ग्लेन मॅक्‍सवेल 31, लियाम प्लंकेट 4-53, मोईन अली 2-47, आदिल रशीद 3-70). 

कार्डिफ (लंडन) - जेसन रॉयची शतकी खेळी आणि त्याला मिळालेल्या जोस बटलरच्या साथीमुळे इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर 38 धावांनी विजय मिळविला. 

रॉय (12) आणि बदली कर्णधार जोस बटलर (नाबाद 91) यांच्या फटकेबाजीने इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 342 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला बढती मिळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने (131) शतक झळकावले. पण, तो ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव 304 धावांत आटोपला. गेल्या आठ एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा सातवा पराभव ठरला. 

आव्हानानचा पाठलाग करताना मार्श एका बाजूने झुंजार खेळत असताना त्याला समोरून साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली. इंग्लंडच्या लियाम प्लंकेटने 53 धावांत 4, तर आदिल रशीदने 70 धावांत 3 गडी बाद केले. 

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना रॉयने पहिल्या चार विकेटसाठी पन्नासहून अधिक धावांच्या भागीदारी केल्या. त्या महत्त्वाच्या ठरल्या. रॉय बाद झाल्यावर बटलरचा धडाका ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची निराशा अधिक वाढवणारा ठरला. 

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड 8 बाद 342 (जेसन रॉय 102, जोस बटलर नाबाद 91, जॉनी बेअरस्टॉ 42, रिचर्डसन 2-64, केन रिचर्डस्‌न 2-56, ऍण्ड्रॅयू टाय 2-81) वि.वि. ऑस्ट्रेलिया 47.1 षटकांत 304 (शॉन मार्श 131, ऍश्‍टन ऍगर 46, ग्लेन मॅक्‍सवेल 31, लियाम प्लंकेट 4-53, मोईन अली 2-47, आदिल रशीद 3-70). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jos Butler and Jason Roy innings gifted england a win in second ODI