बटलरचे प्रतिआक्रमण; इंग्लंड सर्वबाद 400

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंबई: जोस बटलरने रचललेल्या प्रतिआक्रमणामुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 400 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाने एक गडी गमावून 62 धावा केल्या होत्या. खेळ थांबला, तेव्हा मुरली विजय 31 आणि चेतेश्‍वर पुजारा सात धावांवर खेळत होते.

मुंबई: जोस बटलरने रचललेल्या प्रतिआक्रमणामुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 400 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाने एक गडी गमावून 62 धावा केल्या होत्या. खेळ थांबला, तेव्हा मुरली विजय 31 आणि चेतेश्‍वर पुजारा सात धावांवर खेळत होते.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने आतापर्यंत भक्कम कामगिरी केली आहे. पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारल्यामुळे आता सामन्यात आव्हान निर्माण करण्यासाठी भारतीय संघाला झगडावे लागणार आहे. त्यातच, पुनरागमन करणारा सलामीवीर लोकेश राहुल लगेचच बाद झाल्याने भारतीय संघासमोरील अडचणी वाढल्या. वानखेडेची खेळपट्टी हळूहळू फिरकीला साथ देऊ लागली आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर मोईन अली, आदिल रशीद यांची गोलंदाजी खेळणे हे खडतर आव्हान भारतासमोर आहे.

'वन-डे'तील उपयुक्त खेळाडू म्हणून ओळख असलेल्या जोस बटलरने कसोटीतही आपली उपयुक्तता सिद्ध केली. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीवर बटलरने प्रतिआक्रमण केले. बटलरने 137 चेंडूंत 76 धावा केल्या. दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जेक बॉलनेही 60 चेंडूंत 31 धावा केल्या.

भारताकडून आर. आश्‍विनने सहा, तर जडेजाने चार गडी बाद केले. कसोटीत एका डावात पाचपेक्षा अधिक गडी बाद करण्याची आश्‍विनची ही 23 वी वेळ आहे. या कामगिरीत आश्‍विनने कपिलदेव यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. अशी कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांत अनिल कुंबळे (35) आणि हरभजनसिंग (25) हेच आता आश्‍विनच्या पुढे आहेत.

धावफलक :
इंग्लंड : पहिला डाव : 130.1 षटकांत सर्वबाद 400

ऍलिस्टर कूक 46, किटन जेनिंग्ज 112, ज्यो रूट 21, मोईन अली 50, जॉनी बेअरस्टॉ 14, बेन स्टोक्‍स 31, जोस बटलर 76, ख्रिस वोक्‍स 11, आदिल रशीद 4, जेक बॉल 31, जेम्स अँडरसन नाबाद 0
अवांतर : 4
गोलंदाजी :

भुवनेश्‍वर कुमार 13-0-49-0, उमेश यादव 11-2-38-0, आर. आश्‍विन 44-4-112-6, जयंत यादव 25-3-89-0, रवींद्र जडेजा 37.1-5-109-4
भारत : पहिला डाव : 22 षटकांत 1 बाद 62 (चहापानापर्यंत)
लोकेश राहुल 24, मुरली विजय खेळत आहे 31, चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे 7

Web Title: Jos Buttler half century puts England in driver seat against India at Wankhede Stadium