पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए'चे अध्यक्ष

वृत्तसंस्था
Tuesday, 3 July 2018

वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष असतील. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताचे माजी वेगवान गोलंदाज मदनलाल यांचा 517 मतांनी पराभव केला. 
 

नवी दिल्ली - वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष असतील. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताचे माजी वेगवान गोलंदाज मदनलाल यांचा 517 मतांनी पराभव केला. 

रजत शर्मा यांच्या पॅनेलचे निवडणुकीत वर्चस्व राहिले. त्यांनी सर्वच्या सर्व 12 जागा जिंकल्या. रजत शर्मा यांनी 1521 मते पडली. मदनलाल यांना 1004 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील तिसरे उमेदवार विकास सिंग यांना 232 मते मिळाली. 

"बीसीसीआय'चे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना यांच्या अस्तित्वाला या निवडणुकीत धक्का बसला आहे. त्यांची पत्नी शशी या निवडणुकीत उपाध्यक्षपदाची निवडणूक हरल्या आहेत. त्यांना राकेश बन्सल यांनी हरवले. 

रजत शर्मा यांच्या पॅनेलला अनपेक्षित यश मिळाले असले, तरी यामुळे त्यांना मोकळेपणाने संघटनेचे कामकाज चालवता येईल, अशी चर्चा दिल्ली क्रिकेट वर्तुळात सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalist Rajat Sharma is new DDCA president