ज्युनियर क्रिकेटही रणजीप्रमाणे

वृत्तसंस्था
Thursday, 19 April 2018

कोलकाता - देशांतर्गत क्रिकेट भक्कम करण्यासाठी ज्युनियर क्रिकेट भक्कम असणे आवश्‍यक असते. सौरभ गांगुलीच्या तांत्रिक समितीने भारतीय क्रिकेटचा हा पाया अधिक सक्षम करण्यासाठी पुढील (२०१८-१९) मोसमासाठी १९ आणि २३ वर्षांखालील ज्युनियर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा रणजी क्रिकेटच्या धर्तीवर घेण्याची शिफारस केली. 

कोलकाता - देशांतर्गत क्रिकेट भक्कम करण्यासाठी ज्युनियर क्रिकेट भक्कम असणे आवश्‍यक असते. सौरभ गांगुलीच्या तांत्रिक समितीने भारतीय क्रिकेटचा हा पाया अधिक सक्षम करण्यासाठी पुढील (२०१८-१९) मोसमासाठी १९ आणि २३ वर्षांखालील ज्युनियर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा रणजी क्रिकेटच्या धर्तीवर घेण्याची शिफारस केली. 

देशांतर्गत क्रिकेटचा गतमोसम संपल्यानंतर सहभागी झालेल्या संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या परिषदेत मांडण्यात आलेल्या सूचनानंतर तांत्रिक समितीने पुढील मोसमात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये काही माफक बदल केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर बिहार आणि नॉर्थईस्टकडील संघांना स्थान देण्यात आले. तसेच यंदाची रणजी स्पर्धा तीनऐवजी चार गटांत होईल. 

स्पर्धांच्या क्रमवारीतही बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, त्यानुसार रणजीऐवजी विभागीय दुलीप करंडक स्पर्धेने मोसमाची सुरवात होईल. रणजी स्पर्धेची साखळी स्पर्धा होईल, त्यानंतर मुश्‍ताक अली ट्‌वेन्टी-२० स्पर्धा आणि त्यानंतर रणजी बाद फेरीचे सामने सुरू होतील. 

दुलीप करंडक प्रकाशझोतात
देशात अजून कसोटी क्रिकेटचा सामना प्रकाशझोतात खेळवण्याचे धाडस करण्यात आले नसले तरी यंदाही दुलीप करंडक स्पर्धा प्रकाशझोतात खेळवण्यात येतील. त्यासाठी कुकाबुरा बनावटीचे चेंडू वापरण्यात येतील. 

इराणी करंडकाबाबत संभ्रम
तांत्रिक समितीच्या प्रस्तावांची माहिती बीसीसीआयने ई-मेलद्वारे प्रसिद्ध केली. यात पुढील मोसमात स्पर्धांची क्रमवारी देण्यात आली, परंतु त्यामध्ये इराणी करंडकाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. बीसीसीआयकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी जेवढे बदल करण्यात आले तेवढीच माहिती देण्यात आल्याचे सांगितले. वास्तविक बदल नसला तरी क्रमवारी देताना सर्व स्पर्धांचा उल्लेख करायला हवा होता, असे मत क्रिकेट वर्तुळात व्यक्त करण्यात आले.

असे होतील बदल 
रणजी स्पर्धेसाठी चार गट, साखळी सामन्यांनंतर उपउपांत्यपूर्व फेरीपासून बाद फेरी. होम आणि अवे धर्तीवर सामने.
१९ आणि २३ वर्षांखालील ज्युनियर क्रिकेटसाठीही रणजी क्रिकेटची रचना.
दुलीप करंडक, विजय हजारे करंडक (वनडे), रणजी साखळी सामने, मुश्‍ताक अली ट्‌वेन्टी-२० रणजी बाद फेरी, देवधर करंडक या क्रमवारीनुसार यंदाचा मोसम होणार.
मुश्‍ताक अली ट्‌वेन्टी-२० सुपर लीगनंतर उपांत्य आणि अंतिम फेरी.
दुलीप करंडक स्पर्धा कुकाबुरा बनावटीच्या गुलाबी चेंडूंनी प्रकाशझोतात होणार रणजी स्पर्धेतील प्रत्येक गटातून एकेक संघ.
देवधर करंडक स्पर्धाही चार संघांची. प्रत्येक रणजी गटातील एकेक संघ
बिहार, नॉर्थईस्ट संघांना रणजी क्रिकेट स्पर्धेत स्थान.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: junior cricket like Ranji