दुखापतीमुळे केदारला "ब्रेक' घ्यावा लागणार

वृत्तसंस्था
Sunday, 30 September 2018

दुबई- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या जेतेपदावर अखेरच्या चेंडूवर शिक्कामोर्तब केलेला अष्टपैलू केदार जाधव याला उजव्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे काही काळ "ब्रेक' घ्यावा लागण्याची शक्‍यता आहे.

केदारला आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात डाव्या मांडीच्या स्नायूची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला सुमारे तीन महिने विश्रांती घ्यावी लागली होती. या वेळी चपळाईने एकेरी धाव घेताना त्याला पुन्हा त्रास झाला.

सुरवातीला फिजिओ पॅट्रिक फरहात यांनी त्याच्यावर उपचार केले. तो काही चेंडू खेळला, पण त्याला मैदान सोडावे लागले. नंतर त्याला पुन्हा मैदानावर उतरावे लागले. त्याने आतापर्यंतच्या अल्प आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये सर्वांत गाजलेली धाव काढण्यात मात्र यश मिळविले. विजेतेपद साकार झाल्यानंतर त्याने या वेळची दुखापत पहिल्या किंवा दुसऱ्या श्रेणीतील असल्याचे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kedar needs to take breaks due to injury