ख्रिस गेलचे बल्ले...बल्ले!

वृत्तसंस्था
Friday, 20 April 2018

मोहाली  - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही मिळवला. त्याच्या १०४ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव केला. गेलचे आयपीएलमधील हे एकूण सहावे शतक आहे.

पंजाब संघाचा मेंटॉर असलेल्या सेहवागने कोणाकडूनही पसंती न मिळालेल्या गेलला पायाभूत किमतीत दुसऱ्या टप्याच्या लिलावात घेतले. पहिल्या काही सामन्यात तो खेळलाही नव्हता; परंतु संधी मिळताच त्याने आपल्या बॅटचे पाणी दाखवले आणि ६३ चेंडूत १ चौकार आणि तब्बल ११ षटकारांचा घणाघात सादर केला. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर हैदराबादला ४ बाद १७८ धावांत रोखले. या पराभवामुळे हैदराबादची सलग तीन सामन्यातील विजयी मालिकाही खंडित झाली.

गोलंदाजीत हैदराबादचा संघ भक्कम समजला जातो; परंतु गेलच्या तुफानासमोर प्रामुख्याने त्यांच्या रशिद खान आणि शकिब अल हसन या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची मजबूत धुलाई झाली. 

प्रत्युत्तरादाखल हैदराबादला सुरवातीलाच दोन मोठे धक्के बसले. शिखर धवन शून्यावर जखमी झाला आणि साहा सहा धावांवर बाद झाला. बढती मिळालेला युसुफही माघारी फिरला ३ बाद ३७ नंतर कर्णधार विल्यम्सन व मनिष पांडे यांनी अर्धशतके केली.
 
संक्षिप्त धावफलक - पंजाब -२० षटकांत ३ बाद १९३ (ख्रिस गेल नाबाद १०४ -६३ चेंडू, १ चौकार, ११ षटकार, करुण नायर ३१) वि. वि. हैदराबाद ४ बाद १७८ (केन विल्यम्सन ५४, मनिष पांडे नाबाद ५७, शकिब नाबाद २४ शर्मा २-५१)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kings XI Punjab beat Sunrisers Hyderabad by 15 runs