मॅक्‍सवेलच्या तडाख्यामुळे पंजाबची पुण्यावर मात

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

164 धावांचे आव्हान पंजाबने एक षटक राखून पार केले. मॅक्‍सवेलने केवळ 20 चेंडूंमध्ये 44 धावा फटकावल्या. त्याला डेव्हिड मिलरने मोलाची साथ दिली.

इंदूर - कर्णधार ग्लेन मॅक्‍सवेलच्या वेगवान खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या दहाव्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंटवर सहा विकेट राखून मात केली.

164 धावांचे आव्हान पंजाबने एक षटक राखून पार केले. मॅक्‍सवेलने केवळ 20 चेंडूंमध्ये 44 धावा फटकावल्या. त्याला डेव्हिड मिलरने मोलाची साथ दिली. या जोडीने 79 धावांची विजयी भागीदारी रचली. मॅक्‍सवेलने 16व्या षटकात इम्रान ताहीरला दोन षटकार खेचले. हेच आक्रमण निर्णायक ठरले.

पंजाबला गेल्या दोन मोसमांमध्ये अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या वेळी पंजाबने विजयी सलामी दिली. त्याआधी पुण्याने सहा बाद 163 धावा केल्या. सर्वाधिक भाव मिळालेल्या बेन स्टोक्‍स याने अर्धशतक फटकावले. पुण्याची नवव्या षटकात 3 बाद 49 अशी दुरवस्था झाली होती. स्टोक्‍सला मनोज तिवारीने चांगली साथ दिली. पुण्याने शेवटच्या दोन षटकांत 30 धावा वसूल केल्या.

संक्षिप्त धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट - 
20 षटकांत 6 बाद 163 (अजिंक्‍य रहाणे 19-15 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, स्टिव स्मिथ 26-27 चेंडू, 3 चौकार, बेन स्टोक्‍स 50-32 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, महेंद्रसिंह धोनी 5-11 चेंडू, मनोज तिवारी नाबाद 40-23 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, डॅनिएल ख्रिस्तियन 17-8 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, संदीप शर्मा 4-0-33-2, अक्षर पटेल 4-0-27-1, टी. नटराजन 3-0-26-1, स्वप्नील सिंग 2-0-14-1)

पराभूत विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - 19 षटकांत 4 बाद 164 (हशीम अमला 28-27 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मनन व्होरा 14-9 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, वृद्धिमान साहा 14-9 चेंडू, 3 चौकार, अक्षर पटेल 24-22 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, ग्लेन मॅक्‍सवेल नाबाद 44-20 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, डेव्हिड मिलर नाबाद 30-27 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, अशोक डिंडा 3-0-26-1, ख्रिस्तियन 2-0-24-0, स्टोक्‍स 4-0-32-0, इम्रान ताहीर 4-0-29-2, दीपक चहर 4-0-32-1, रजत भाटिया 2-0-20-0)

Web Title: Kings XI Punjab vs Rising Pune Supergiants: Glenn Maxwell is a hero