राणाची अष्टपैलू कामगिरी;नाइट रायडर्सचा विजय

वृत्तसंस्था
Thursday, 19 April 2018

जयपूर - नितीश राणाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोलकता नाइट रायडर्सने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला घरच्या मैदानावर सात गडी राखून पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला २० षटकांत ८ बाद १६० धावांचीच मजल मारता आली. कोलकताने १८.५ षटकांत ३ बाद १६३ धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना सुनील नारायण आणि रॉबिन उत्थप्पा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करून विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर राणा आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी ६१ धावांची नाबाद भागीदारी करून विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्तिक २३ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह ४५ धावा काढून नाबाद राहिला. राणाने गोलंदाजीत दोन गडी बाद केल्यानंतर फलंदाजीत २७ चेंडूंत नाबाद ३५ धावांचे योगदान दिले. 

त्यापूर्वी अजिंक्‍य रहाणे आणि डीआर्सी शॉर्ट यांच्या आक्रमक सुरवातीचा फायदा राजस्थानच्या अन्य फलंदाजांना उठवता आला नाही. शेवटी बटलरने तग धरल्यामुळे त्यांची धावसंख्या दीडशेच्या पुढे जाऊ शकली.

संक्षिप्त धावफलक   
राजस्थान २० षटकांत ८ बाद १६० (शॉर्ट ४४, रहाणे ३६, बटलर नाबाद २४, राणा २-११, क्‍युरन २-१८) पराभूत वि. कोलकता १८.५ षटकांत ३ बाद १६३ (कार्तिक नाबाद ४५, उथप्पा ४८, राणा ३५, नारायण ३५, गौतम २-२३)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knight Riders Victory